ETV Bharat / city

अहो आश्चर्यम!!! कोल्हापूरात गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम, नवी कोरी सहावार साडी भेट - Cow babyshower program was held at Goliwade in Kolhapur

सर्रासपणे शेतकऱ्यांच्या घरात गायी, म्हशी पाहायला मिळतात. तसेच ते आपल्या प्राण्यांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणेच काळजी घेत असतात. कोल्हापूरात एका शेतकरी कुटुंबाने आपल्या गायीचा ओटी भरणीचा कार्यक्रम ठेवल्याने, त्यांचे आपल्या प्रण्यांप्रती असलेले प्रेम यातून दिसून आले आहे.

गायीचा ओटी भरणीचा कार्यक्रम
गायीचा ओटी भरणीचा कार्यक्रम
author img

By

Published : Apr 27, 2021, 9:18 AM IST

Updated : Apr 27, 2021, 12:42 PM IST

कोल्हापूर - शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. जिल्ह्यात सर्रास प्रत्येकाच्या घरात गायी, म्हशी पाहायला मिळतात. आपल्या प्राण्यांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून, एका शेतकरी कुटुंबाने आपल्या गायीचा ओटी भरणीचा कार्यक्रम ठेवल्याने त्यांचे आपल्या प्रण्यांप्रती असलेले प्रेम यातून दिसून आले आहे.

कोल्हापूरातल्या गोलीवडेमध्ये पार पडला गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम

पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे गावचे शेतकरी

कोल्हापूरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडेमधील सुशांत संजय जाधव यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून पाळीव प्राणी आहेत. या प्राण्यांचे त्यांच्या कुटुंबात एक वेगळं स्थान आहे. यावेळी त्यांनी आपल्या खिलार जातीच्या गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम करायचे ठरवले. त्यांच्या पत्नी कोमल सुशांत जाधव यांनी सुद्धा तत्काळ होकार देत गायीच्या ओटीभरणीची तयारी केली आणि अगदी महिलांचा ओटीभरणी कार्यक्रम असतो तसा कार्यक्रम साजरा केला.

गायीला सहा वार साडी व ओटीभरणी कार्यक्रमाला फोटोग्राफर सुद्धा

खरंतर प्रत्येक महिलांना त्यांचा ओटीभरणी कार्यक्रम नेहमीच लक्षात असतो. महिला त्यावेळी हौसेने फोटोशूट देखील करतात. सुशांत जाधव आणि त्यांच्या पत्नी कोमल जाधव यांनी सुद्धा आपल्या गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम नेहमी लक्षात रहावा यासाठी एका फोटोग्राफरला बोलवले. फोटोत आपली गाय देखणी दिसावी यासाठी मोगऱ्याचा गजरा, गळ्यात हार आणि दोन्ही शिंगांना लाल रंगाचा रिबीन बांधून तिला सजविण्यात आले. शिवाय नव्या कोऱ्या हिरव्यागार सहा वार साडीने गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गावातल्या बहुतांश महिलांनी सुद्धा हजेरी लावली होती. दरम्यान, आपल्या गायीप्रती व्यक्त केलेल्या या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - कार्टून्स पाहा आता आपल्या मराठीत! 'ईटीव्ही बालभारत' आज होणार लॉन्च!

Last Updated : Apr 27, 2021, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.