कोल्हापूर - मटणाच्या संदर्भात पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ झाला. कृती समिती आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यातच वाद झाला. मटण विक्रीसाठी आणलेली बकरी तपासणी करण्याच्या मुद्द्यावरून कृती समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अशा सर्वच मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
हेही वाचा - सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी? राजू शेट्टींचा सवाल
बुधवारी सकाळी मटण विक्रीचे निकष न पाळल्याने अन्न-औषध विभागाने मटण दुकानांवर कारवाई केली होती. कोल्हापुरातील बहुतांश दुकानांमध्ये स्वच्छतेचे सर्वच नियम धाब्यावर बसवून मटण विक्री सुरू आहे. त्यात अनेक ठिकाणी विक्रीसाठी आणलेली बकऱ्या तपासणी न करताच कापली जातात आणि त्याची विक्री होते, हा मुद्दा कृती समितीच्या सदस्यांनी आता उचलून धरला आहे. ज्या प्रकारे बुधवारी मटण दुकानावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे आता सर्वच अस्वच्छ आणि आरोग्यास घातक असणाऱ्या दुकानांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावरूनच आज आयुक्तांनी बोलविलेल्या बैठकीत कृती समितीच्या सदस्य आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात वादावादी झाली.
हेही वाचा - कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई