कोल्हापूर - शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल केतकी चितळे यांचा सर्वच स्तरातून तीव्र शब्दात निषेध होत आहे. दरम्यान कोणत्याही ज्येष्ठ नेत्यावर बोलत असताना आपण काय बोलत आहे याचे भान असले पाहिजे. अलीकडे सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोलले जात आहे, अशा प्रकारचे शब्द कोणीही वापरू नये अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा - Artists Tribute To Shahu Maharaj : कोल्हापुरात देशातील विविध कलाकार वाहणार लोकराजाला आदरांजली!
छत्रपती संभाजी राजे हे आमचे दैवत : छत्रपती संभाजी राजे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संभाजीराजेंचा छळ करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर जो जाईल तो हिंदूंचाच नव्हे, तर मुसलमानांचाही अपमान करणारा आहे. अकबरुद्दीन ओवैसी यांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - Native Cow Village Kolhapur : एक समाज एक गाव, देशी गायींचे गाव म्हणून लक्ष्मीवाडीची ओळख!