ETV Bharat / city

Kolhapur Dahihandi 2022 अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव, पुरग्रस्तांची प्रतिकात्मक धरण फोडून दहीहंडी साजरी

कोल्हापूरात आजपर्यंत उद्भवत असलेल्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण Almatti Dam जबाबदार आहे, असे म्हणत आज कोल्हापूरातील सिटीझन फोरम Citizens Forum आणि पुरग्रस्तांनी flood victims Kolhapur अलमट्टी धरणाची प्रतिकृती फोडून दहीहंडी breaking the symbolic dam साजरी Kolhapur Dahihandi 2022 केली. जोपर्यंत अलमट्टी धरणाची उंची कमी करण्याबद्दल निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा सुद्धा सिटीझन फोरमचे ऍड. प्रसाद जाधव यांनी दिला.

author img

By

Published : Aug 19, 2022, 8:35 PM IST

Kolhapur Dahihandi 2022
कोल्हापूर दहीहंडी 2022

कोल्हापूर कोल्हापूरात आजपर्यंत उद्भवत असलेल्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण Almatti Dam जबाबदार आहे, असे म्हणत आज कोल्हापूरातील सिटीझन फोरम Citizens Forum आणि पुरग्रस्तांनी flood victims Kolhapur अलमट्टी धरणाची प्रतिकृती फोडून दहीहंडी breaking the symbolic dam साजरी Kolhapur Dahihandi 2022 केली. यावेळी अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव च्या घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन शिवाजी चौक याठिकाणी करण्यात आले. वारंवार याबाबत मागणी करून सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही. जोपर्यंत अलमट्टी धरणाची उंची कमी करण्याबद्दल निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा सुद्धा सिटीझन फोरमचे ऍड. प्रसाद जाधव यांनी दिला.

2005 पासून महापुराचे संकट यावेळी प्रसाद जाधव म्हणाले, 2005 पासून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने पश्चिम महाराष्ट्रातील नदी व बाजूचा परिसर पाण्याने व्यापून महापूर येऊ लागला हे वास्तव आहे. याबाबत शासनाने दखल घ्यावी, यासाठी आंदोलने केली आहेत. पण वेळोवेळी राज्यात व देशात सरकार बदलतात आणि या बळीराजाच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. याकरिता मागील पुरपरिस्थीतीचा आढावा व बऱ्याच समित्यांचे अहवाल अभ्यास करून सिटिझन फोरमद्वारे शासन दरबारी पत्र व्यवहार केला आहे. त्यामुळे आता या गंभीर विषयावर लक्ष वेधून घेण्यासाठी, अलमट्टी धरणाची प्रतीकात्मक दहीहंडी फोडण्यात आली. शिवाय अलमट्टी धरणाची उंची कमी करण्यासाठी पुन्हा एकदा जन आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.

हेही वाचा Abdul Sattar कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस शेती करणार आणि शिकणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.