ETV Bharat / city

Kolhapur by - election : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला कामकाजाचा आढावा, 'सी व्हिजिल ॲप' वापरण्याचे आवाहन - सी व्हिजिल ॲप कोल्हापूर

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी अधिकाऱ्यांसोबत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल ॲप’ ( C vigil app ) बनविले असल्याचे त्यांनी सांगितले.

shrikant Deshpande on C vigil app
सी व्हिजिल ॲप कोल्हापूर
author img

By

Published : Mar 23, 2022, 8:47 AM IST

Updated : Mar 23, 2022, 12:04 PM IST

कोल्हापूर - दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे ( Shrikant Deshpande on Kolhapur North by election ) यांनी अधिकाऱ्यांसोबत कामकाजाचा आढावा घेतला. पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. यावेळी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल ॲप’ ( C vigil app ) बनविले असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

हेही वाचा - Rang Panchami : कोल्हापुरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी राजाराम तलाव परिसरातील गोदाम येथील मतमोजणी कक्ष व स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका शांततेत पार पाडा, तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षी शाहूजी सभागृहात देशपांडे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना. वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी अमित माळी आदी उपस्थित होते.

आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून ‘सी व्हीजल ॲप' ची निर्मिती

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त असिस्टंटची नियुक्ती करावी. तसेच, आदर्श आचारसंहितेच्या पालनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रशासनाने बीएलओ ची संख्या वाढवावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून ‘सी व्हिजिल ॲप’ बनविले आहे. याचा वापर पदाधिकाऱ्यांनी करावा. त्याचबरोबर मतदात्यांनी ‘वोटर्स हेल्पलाईन ॲप’ चा वापर करून आपले नाव मतदार यादीत आहे की, नाही याची खात्री करावी, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.

मतदानाला येताना पुढील ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार

निवडणुकीसाठी जिल्ह्यात 311 मूळ व 47 सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण 358 मतदान केंद्रे आहेत. तर, मतदात्यांनी या निवडणुकीसाठी पॅन/आधार कार्ड, मनरेगा सेवा पत्र, बँक/पोस्ट ऑफीसचे छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा योजनापत्र (हेल्थ स्मार्ट कार्ड), लायसन्स, पासपोर्ट, छायाचित्रासह निवृत्तपत्र, केंद्र, राज्य, निम्न शासकीय कर्मचारी ओळखपत्र, केंद्र सरकारचे दिव्यांग ओळखपत्र, संसद, विधानसभा/परिषद सदस्यांचे कार्यालयीन ओळखपत्र अशा एकूण 12 विविध बाबींचा मतदान छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दिव्यांग, सिनियर सिटिझन आणि कोरोना पॉझिटिव्ह मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 779 मतदार असून 80 वर्षांवरील 11 हजार 263 मतदार आहेत आणि दिव्यांग 427 मतदार आहेत. तर, तृतीयपंथी 12 मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग व्यक्ती व सिनियर सिटिझनसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, हा एक पर्याय असून ज्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येते अशाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे. तसेच त्या काळात एखादा मतदार हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यासाठी देखील पोस्टल बॅलेटची सुविधा देण्यात आल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा - Kolhapur Trees Felled : सह्याद्री व्याघ्रप्रकल्प परिसरात लाखो वृक्षांची कत्तल; वनविभागाची कारवाई

Last Updated : Mar 23, 2022, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.