कोल्हापूर : महिलांच्या प्रेगनन्सी तपासणीसाठी बाजारात किट उपलब्ध ( Cows and Buffaloes Can Also Use Pregnancy Kit ) आहेत. मात्र, आता जनावरांसाठीसुद्धा, असे किट मिळत असून, गाय किंव्हा म्हैशीची गर्भधारणा झाली आहे की नाही. हे पाहण्यासाठी 3 महिने वाट पाहावी लागणार नाहीये. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामार्फत याची ( Investigated Through Gokul Dudh Sangh in Kolhapur ) तपासणी केली ( Animals Need at Least 3 Months to Ensure ) जात असून त्याचा दूध उत्पादकांना चांगलाच फायदा होताना पाहायला मिळत आहे. शिवाय या किटद्वारे केलेली चाचणी शंभर टक्के खरी ठरत असल्याचेही दिसत आहे. काय आहे हे प्रेगनन्सी किट? कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आणि कुठे मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी या विशेष मुलाखतीतून.
गर्भ तपासणी किटबाबत सविस्तर माहिती : जनावरांना कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन केल्यानंतर त्यांच्या गर्भधारणेच्या खात्रीसाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, सध्या नवीन तंत्रज्ञानाद्वारे बनविलेल्या किटमुळे जनावरांच्या रक्ततपसणीद्वारे 28 दिवसांतच खात्रीलायक निदान होणार आहे. हे गर्भ तपासणी किट अर्थात रॅपिड व्हिज्युअल प्रेगनन्सी टेस्ट किट अमेरिकेतील मे. आयडिएक्स लॅबोरेटरी ( Animals Pregnancy Test Kit is Made in America ) या कंपनीने बनविले असून, गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेव्हा एखाद्या म्हैशीचे किंव्हा गायीचे कृत्रिम किंव्हा नैसर्गिक पद्धतीने रेतन केले जाते. त्यानंतर पुढच्या 28 दिवसांनी संबंधित जनावरांच्या केवळ 2 मिली रक्त काढून घेऊन या किटद्वारे तपासणी केली जाते. त्याद्वारे तत्काळ हे जनावर गाभण आहे किंव्हा नाही हे समजले जाते. गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेत हे निदान करून मिळणार आहे.
एवढा आहे खर्च : या एका गर्भ तपासणी किटची किंमत जवळपास 244 रुपये इतकी आहे. यासाठी गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना 25 टक्के इतके अनुदान दिले जात आहे. त्यामुळे किट केवळ 184 रुपयांपर्यंत मिळणार आहे. या किटमुळे तीन महिने जनावर गाभण आहे की नाही हे तपासण्यासाठी वाट पाहावी लागते ती पाहावी लागणार नाहीये. शिवाय जनावरांचा भाकड काळसुद्धा कमी करण्यास मदत होणार आहे. दरम्यान, यापूर्वी 22 जनावरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील आलेले निदान 3 महिन्यानंतर पुन्हा तपासणी करून पाहिल्यावर अगदी 100 टक्के बरोबर आले आहे. त्यामुळे हेसुद्धा याचे वैशिष्ट्य असल्याचेही येथील डॉक्टर सांगतात.