कोल्हापूर - जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध आजपासून हटविण्यात आले आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये ही शिथिलता देण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील इतर भागात मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.सोमवार पासून 9 जुलै पर्यंत हे निर्बंध हटविण्यात आले असल्याबाबतची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. आता अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकानं, आस्थापना 9 जुलैपर्यंत सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
परिस्थितीचा आढावा घेऊन पाच दिवसांनंतर निर्बंधाबाबत निर्णय घेणार -
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व दुकानदार, आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेमध्येच ही दुकाने सुरू असणार आहेत. शिवाय या काळामध्ये शहरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूणच कोरोनाबाबतचा आढावा घेण्यात येणार असून, पुन्हा रुग्ण वाढू लागले तर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे निर्बंध हटवले म्हणून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत अशी विनंती सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
तर दुर्दैवाने पुन्हा निर्बंध लावावे लागतील -
पालकमंत्री म्हणाले, कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध 5 दिवसांसाठी हटवले असले तरी सर्व काही सुरू आहे, म्हणून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करा, जर नागरिकांनी या पाच दिवसांमध्ये गर्दी केली आणि पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू लागली तर दुर्दैवाने पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांनीच आता निर्बंध पाळावेत, अशी विनंती पाटील यांनी केली आहे. शिवाय व्यापाऱ्यांनी सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करून गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन सुद्धा सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर शहरातील सर्व निर्बंध हटवले, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; जिल्ह्यात निर्बंध जैसे थे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व दुकानदार, आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेमध्येच ही दुकाने सुरू असणार आहेत.