ETV Bharat / city

विधानपरिषद निवडणूक : प्रस्ताव बरा आला तर आमची बिनविरोधसाठी तयारी - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील बातमी

विधानपरिषदेच्या निवडणुका (Legislative Council Election 2021) बिनविरोध करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आला नाही. पण, प्रस्ताव बरा आला तर आमची तयारी असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 23, 2021, 7:20 PM IST

Updated : Nov 23, 2021, 9:50 PM IST

कोल्हापूर - होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका (Legislative Council Election 2021) बिनविरोध करण्याबाबत हालचाली सुरू आहेत अशी चर्चा आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील भाजप पक्षाचा प्रमुख म्हणून माझ्यापर्यंत अशा चर्चा पोहोचतात. मात्र, अद्याप असा कोणताही प्रस्ताव आला नाही. जर आला तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

  • भाजप कोणताही प्रस्ताव देणार नाही, आमची तयारी पूर्ण :

भाजपने ही निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे प्रस्ताव देणार नाही. धुळ्यातील जागेसाठी आम्ही वन वे आहोत. कोल्हापूरमध्येसुद्धा आम्हाला 165 जणांचा सद्यस्थितीत पाठिंबा आहे. जिंकण्यासाठी 43 मतांची गरज आहे त्याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे. नागपूरमध्येसुद्धा हीच परिस्थिती असून आम्ही 90 मातांनी पुढे आहोत. मुंबईमध्येसुद्धा काही अडचण नसून केवळ अकोलामध्ये चुरशीची लढत होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पण प्रस्ताव आला तर विचार करू, शिवाय 26 तारीख अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जे काही होईल ते लवकर करावे लागेल, असेही पाटील यांनी म्हंटले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • उगाचच वेळ आणि पैसा घालवणे हा कोणाचा स्वभाव नाही :

राज्याची परंपरा अशी आहे की, उगाचच कोणावर कुरघोड्या करणे, उगाचच वेळ आणि पैसा घालवणे हा कोणाचा स्वभाव नाही भाजपचा तर अजिबात तसा स्वभाव नाही. त्यामुळे ज्याज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी आवाहन केले आणि आम्ही मान्य केले. शिवाय सद्यस्थितीत भाजप सहा पैकी पाच जागा जिंकत असताना स्वतःहून का प्रस्ताव देईल असे म्हणत भाजप कोणत्याही पद्धतीने प्रस्ताव देणार नसल्याचेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. शिवाय जर प्रस्ताव बरा आला तर त्यावर पुढची भूमिका घेऊ, असेही त्यांनी म्हंटले.

  • 'लांडगा आला रे आला' गोष्टीप्रमाणे होईल :

चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांत अनेकवेळा यांचे सरकार पडेल याबाबत बोलले आहेत. सरकार पडल्यानंतरच्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत विचारले असता 'लांडगा आला रे आला' या गोष्टीचे उदाहरण देत पुन्हा एकदा सरकार पडेल अशाबाबत पुनरुच्चार केला.

  • नागपूरमध्ये काल प्रवेश केलेल्यांना तिकीट देता :

नागपूरमध्येसुद्धा आम्ही 90 मतांनी पुढे असून, याठिकाणी तुल्यबळ लढत होईल अशी शक्यता नाही. त्याठिकाणी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत जे वाद होतील ते होतीलच, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

Last Updated : Nov 23, 2021, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.