कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुका असुदेत किंव्हा मुंबई महानगरपालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation) आता फक्त भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले (Chandrakant Patil statement) आहे. राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर आले, यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा सुद्धा मोठा विजय होताना दिसत (next focus Mumbai Municipal Corporation) आहे.
यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी यापुढे फक्त भाजप आणि शिंदे यांच्या गटाचाच झेंडा लागणार असल्याचे त्यांनी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील 70 हुन अधिक अंगणवाडींना आवश्यक साहित्य आणि पोषण आहार वाटण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Kolhapur gram panchayat elections)
बळजबरीने हद्दवाढ करणे सोयीचे नाही : यावेळी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, जोपर्यंत हद्द वाढीच्या विषयामध्ये ज्या गावांना महानगरपालिकेमध्ये समावेश करून घ्यायचा आहे, त्या गावांशी संवाद झाल्याशिवाय बळजबरीने हद्दवाढ करणे सोयीचं ठरणार नाही. हद्दवाढ झाली पाहिजे, असे वाटणाऱ्या सगळ्या नेत्यांनी महापालिकेशेजारच्या सगळ्याच गावांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी स्वतः अदृश्य पद्धतीने अनेकांशी बोलतोय. याचे काय फायदे आहेत, याबाबत त्यांना माहिती देतोय. हे काय भारत पाकिस्तान युद्ध नाही. हा मुद्दा सामंजसानेच मिटला पाहिजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. मी सुद्धा अदृश्य पद्धतीने का होईना प्रयत्न करत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी (Gram Panchayat election won) म्हंटले.