ETV Bharat / city

Chandrakant Patil on ST Strike : एसटी कर्मचारी संपाची लागली वाट, सरकारचा प्रयत्न सफल - चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील सीबीएस स्टँड जर विकले तर ( Kolhapur CBS Stand price ) किती रक्कम येईल ? संपाची पूर्ण वाट लागली आहे. मनाला येईल ते सुरू अशी टीका भाजप प्रदेशाध्यांनी ( MH BJP president on FRP ) केली. संपाची पूर्ण वाट लागली आहे. सरकारचा हेतू सफल झाला असल्याचेही भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Feb 22, 2022, 4:56 PM IST

Updated : Feb 22, 2022, 5:57 PM IST

कोल्हापूर - एसटी महामंडळ बंद करणे आणि एसटी डेपोच्या जागा विकासासाठी देणे आदी कारणांसाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा प्लॅन ( Chandrakant Patil on ST strike ) होता. त्या प्लॅनमध्ये एसटी कर्मचारी अडकले. जागा हडपण्याच्या बाबतीत प्रसिद्ध असणारी ही महाविकास आघाडी आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेशाध्यांक्षांनी केले. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आज सुनावणी होत आहे. यासंदर्भातच बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा मोठा प्लॅन होता. त्या प्लॅनमध्ये एसटी कर्मचारी अडकले. आपण रस्त्यावर उतरू, त्यानंतर हे सरकार आपल्याला न्याय देईल, असे वाटले. पण हे झाले नाही. सरकारने कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढले. कोल्हापुरातील सीबीएस स्टँड जर विकले तर ( Kolhapur CBS Stand price ) किती रक्कम येईल ? संपाची पूर्ण वाट लागली आहे. सरकारचा हेतू सफल झाला असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

राज्य सरकार शेतकरी विरोधी सरकार

हेही वाचा-एसटी विलिनीकरणाचा अहवाल न्यायालयाकडे, तो मिळाल्यावर त्यावर बोलू - मंत्री अनिल परब
मनाला येईल ते सुरू -
राज्य सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान नाही. त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. पूरग्रस्तांना अद्याप मदत नाही. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याच पद्धतीने आताही एफआरपीबाबत निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचे दोन तुकडे करणारा कायदा आहे. जे मनाला येईल ते सुरू अशी टीका भाजप प्रदेशाध्यांनी ( MH BJP president on FRP ) केली.

हेही वाचा-Relief to Sameer Wankhede :मुंबई उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडेंना अटकेपासून 28 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

शेतकरी ऊस उत्पादनच बंद करतील-

केंद्राचा कायदा सांगतो 14 दिवसांत जर एफआरपी ( FRP rule of central gov ) दिली नाही तर त्यावर कायदेशीर कारवाई होऊन व्याज द्यावे लागते. मात्र आता तर एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या काळात साखरेला दर नसतानाही कारखान्यांना कर्ज देऊन त्यांना सहकार्य केले. हे असे कोणतेही मार्ग अवलंबणार नाहीत. मात्र, आता भारतीय जनता पक्ष तीव्र लढा उभा करेल असेही त्यांनी म्हटले आहे. भविष्यात जर शेतकऱ्याला एकरकमी दर नाही मिळाला तर शेतकरी ऊस उत्पादनच बंद करतील, अशी भीतीही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.

हेही वाचा-गॅस एजन्सी कामगाराला धमकी देऊन बेदम मारहाण; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल

Last Updated : Feb 22, 2022, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.