कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील म्हणतात भाजपाने ही निवडणूक कोल्हापूरकरांवर लादली. मात्र ही निवडणूक त्यांनीच लादली आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवाय अजूनही 24 तास शिल्लक आहेत, जयश्री जाधव यांना भाजपामध्ये द्या. आम्ही सत्यजित उर्फ नाना कदम यांना समजावतो, असेही म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला ऑफर दिली आहे.
आज (बुधवारी) दोन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल - काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर तिकडे सत्यजित उर्फ नाना कदम यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत आम्ही कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे निवडणूक लादण्यावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी आम्ही ही निवडणूक लादली नाही, असे म्हटले आहे. अजूनही 24 तास शिल्लक आहेत, ज्या जयश्री जाधव भाजपाच्या होत्या त्यांना परत भाजपामध्ये द्या. आम्ही ही निवडणूक बिनविरोध करतो. शिवाय सत्यजित कदम यांना मनवून एबी फॉर्म बदलतो, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जयश्री जाधव यांनी सुद्धा आपण चंद्रकांत पाटील यांना विनंती केली होती. आपले पती चंद्रकांत जाधव यांनी जो झेंडा हाती घेतला होता, त्याच काँग्रेसमधून पुढे काम करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - Babanrao Lonikar : मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प सरकारने गुंडाळला - बबनराव लोणीकर