ETV Bharat / city

मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष, समाजमाध्यमातून रात्री 8:30ला साधणार संवाद

मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सायंकाळी 8:30ला संवाद साधणार आहेत. राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेणार, का कडक निर्बंध लावले जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

C M will interact with the people of the state through social media at 8:30 pm
मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सायंकाळी 8:30ला साधणार संवाद
author img

By

Published : Apr 2, 2021, 3:10 PM IST

Updated : Apr 2, 2021, 5:27 PM IST

मुंबई - मुख्यमंत्र्यांची कोविड उपाययोजनांसंदर्भात सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात निर्बंध कडक केले जाणार असल्याची शक्यता असून यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यात लॉक डाऊनचा निर्णय घेणार का कडक निर्बंध लावले जाणार याकडे लक्ष आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविड उपाययोजनांसंदर्भात सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सायंकाळी साडेचार वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरसद्वारे उपास्थित असणार आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा उच्चांक गाठला जातोय. ही राज्यसरकारसाठी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत सरकारकडून निर्बंध कडक केले जाणार असल्याचे संकेत राज्यसरकारने दिले आहेत. परिस्थिती भयाण होत राहिल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असेही वेळोवेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या या महत्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

लोकल, बस प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता-

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. वाढत्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे. नागरिकांकडून शासनाच्या नियमांना हरताळ फासला जातो आहे. त्यामुळे राज्यसरकारने पुन्हा लोकल, बस प्रवासावर निर्बंध लादण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या रविवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही नियमावली लागू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लॉकडाऊन परवडणार नाही -

देशात कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या चिंताजनक आहे. दर दिवशी वाढणाऱ्या नव्या रुग्ण संख्येने सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्रशासित प्रदेशातील ४६ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७१ टक्के रुग्ण आहेत. तर ६९ टक्के मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा पर्याय टास्क फोर्स समितीने सुचवला आहे. मात्र, लॉकडाऊन राज्याला परवडणारा नाही, नोकरी-धंदे जातील. अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, असे सूर सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्षातूनही उमटत आहेत.

गर्दीच्या ठिकाणावर निर्बंध -

लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क घालावा, हात धुवावेत आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. परिणामी रुग्ण वाढत असल्याने बेड, व्हेंटिलेटर, आरोग्य सुविधांची कमतरता निर्माण होईल, अशी भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे.

लोकल, बससाठी विशेष मार्गदर्शक सूचना -

मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्सना ठराविक कालावधीसाठी मंजुरी दिली. आता ते देखील काही कालावधीसाठी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दुकाने, बाजारपेठ, फेरीवाल्यांकरिता मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील. तसेच मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लोकल आणि बस प्रवासावर निर्बंध घातले जाणार आहेत. तसेच उपनगरी लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बसेस करता कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर कोविड चाचणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या उपाययोजना राज्य सरकार आखत आहे. उद्योगधंदे, सेक्टर हाऊसना पूर्ण क्षमतेने काम करण्यास अनुमती दिली जाईल. मात्र, त्यासाठी कोरोना चाचणी आणि नियमावलीचे पालन करणे सक्तीचे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Last Updated : Apr 2, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.