कोल्हापूर - प्रक्रिया न केलेला कचरा फेकल्याप्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषींवर कारवाई न करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार आज भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात टाळे ठोकण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी ( BJPs attempt to lock PCB office ) केला आहे. यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करणारे भाजप कार्यकर्ते आणि पोलिसात धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले ( Kolhapur police arrest BJP party workers ) आहे. यापूर्वी भाजपच्यावतीने कचरा घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करण्याचे निवेदन प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिले होते.
हेही वाचा-Trader Kidnapped for Ransom : दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्यास हात-पाय बांधून कालव्यात फेकले
भाजपने प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्याला धरले धारेवर
महानगरपालिकेकडे साठलेला व कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात त्याठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या २१ दिवसात प्रदूषण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे कारवाई न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपाने दिला होता.
भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यालयास टाळे घालण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आज भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्योग भवनासमोर जमत घोषणा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे जाऊ लागले. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या गेटजवळ अडवले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी आंधळे व उपविभागीय अधिकारी माने यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. २१ दिवसांपूर्वी प्रकार उघडकीस आणूनही अजून कारवाई का केली नाही ? पाणी प्रदूषणाची नोटीस दोन दिवसांत देता मग कचऱ्याच्या नोटीसला इतका वेळ का ? महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी तुमचे लागेबांधे आहेत का ? कचऱ्याचा प्रश्न पाण्या इतकाच महत्वाचा नाही का ? असा संतप्त सवाला करत भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
24 जानेवारीला महापालिकेला पाठविली नोटीस
24 जानेवारी रोजी आम्ही महानगरपालिकेला करणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रोटोकॉलनुसार होत असते. महापालिकेने प्रक्रिया न करता कचरा कसबा बावडा येथील डंपिग ग्राउंड येथे टाकल्याचे तक्रार मिळाली होती. त्या तक्रारीनुसार आम्ही महापालिकेला नोटीस बजावली आहे. उत्तर आले की पुढील कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी रवींद्र आंधळे ( PCB officer Ravindra Andhale ) यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार