कोल्हापूर - राज्यातील अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पार्टीने उद्योग सुरू केला. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण भाजपात गेले. मात्र, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्याला अपवाद ठरले. आरोप करणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र, भाजपाने दिलेला त्रास हा भाजपाला सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. न्यायालयाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया कोल्हापुरात दिली आहे.
'छगन भुजबळ त्याला अपवाद' -
आम्ही अनेक दिवस सांगत आलो आहे, छगन भुजबळ यांच्यावरील आरोप खोटे आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले. मूळ आरोप ठेवत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. मात्र, आता न्यायालयाने दिलेले क्लीनचिट ही समाधानाची बाब आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, केवळ छगन भुजबळ यांच्यावरच असे गुन्हे दाखल केले नाहीत. तर राज्यातील अनेक वेगवेगळ्या प्रकरणात अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. जाणीवपूर्वक ईडी आणि सीबीआय आणून भाजपा हा उद्योग करत आहे. मात्र, राज्यातील जनतेने छगन भुजबळ यांना साथ दिली. छगन भुजबळ हे धीराने या सर्व गोष्टीला सामोरे गेले. अनेक जण तुरुंगवासाच्या भीतीने सत्तेत गेले. पण छगन भुजबळ त्यांना अपवाद ठरले, अशी प्रतिक्रियाही जयंत पाटील यांनी दिली.
हेही वाचा- सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही - छगन भुजबळ