कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मोठी गमंत आहे. शेतकऱ्यांना सरकारचे मत एकायच नाही, शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी, असा प्रकार सुरू आहे. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला तयार असताना शेतकऱ्यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका दिल्लीतील आंदोलनावर राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.
'त्यांच्या अपेक्षा वाढल्या'
सत्तर दिवस आंदोलन सुरू आहे. सरकारची चर्चेची भूमिका तपासून बघा. सुरुवातीला दिल्लीतील शेतकरी एक मागणी घेऊन गेला. यांच्या अपेक्षा वाढल्या. काही दिवसांनी चार मागण्या घेऊन गेले, त्यातील तीन मागण्या मान्य केल्या. तरीदेखील विरोध सुरू आहे, याचे गमक कळले नाही, हे आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नाही, राजकीय आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे, असा टोला पाशा पाटील यांनी लगावला.
लातूर जिल्ह्यात केवळ ०.६२% जंगल
पुढे ते म्हणाले, की कोरोनापेक्षा भयंकर कॅनडा ऊरीस ही बुरशी पिकांवर येत आहे. पर्यावरणातील बदलामुळे असे विषाणू मनुष्यजातीला संपवण्यासाठी येत आहेत. देशातील अधिकाऱ्यांनी कागदावर झाडे लावली आहेत. जिल्ह्यात ३३ टक्के राखीव जंगल असावे लागते, पण लातूर जिल्ह्यात केवळ अर्धा टक्के जंगल शिल्लक आहे. ही दुर्दैवी बाब आहे.
नितीन गडकरी यांचे आभार
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युरो सिक्स इंजिन असणाऱ्या गाड्या वापरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबद्दल त्याचे मी अभिनंदन करतो, असे पाशा पटेल म्हणाले.
पृथ्वीरक्षण या नव्या चळवळीला सुरुवात
इंग्लंडचा राजा चार्ल्स यांनी पृथ्वी तलावावरील माणूस जगावायचा असेल तर पुढील दहा वर्षे पर्यावरणातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी झाडे लावली पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पृथ्वीरक्षण चळवळ घेऊन मी देशभर फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपळ व वड, बांबू झाडे लावण्याचे आवाहन
दिवसां व रात्रीदेखील वड व पिंपळ हे कार्बन डायऑक्साईड शोसण्याचे काम करते. पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी ही दोन झाडांची संख्या वाढवण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांनी पीक स्वरूपात झाडे लावली पाहिजे. ज्या झाडातून पैसे आणि ऑक्सिजन मिळेल अशा झाडांची पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
बांबूची झाडे लावण्याचा संकल्प
गोदावरी व मांजरा नदी लातूर जिल्ह्यातूल वाहतात. गेल्या तीनवर्षांपासून पाण्याची अधिक टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी या दोन्ही नदीच्या ४ हजार हेक्टर क्षेत्रात २० हजार लाख बांबूची झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
'त्यावेळी शरद पवार कुठे होते?'
शेतकऱ्यांचे नेते शरद पवार आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. या कायद्यावर राज्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी शरद पवार राज्यसभेत कुठे होते, असा सवाल पाशा पटेल यांनी केला.