ETV Bharat / city

मोदींना विनंती करेल, शेतकऱ्यांना समजावून सांगून 'ते' तीन कायदे पुन्हा आणू : चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील बातमी

पर्याय नाही म्हणून तीन कृषी कायदे मागे(Farm Laws Repeal) घ्यावे लागले आहेत. शेतकऱ्यांना समजावून सांगून आपण हे कायदे पुन्हा आणण्याबाबत नरेंद्र मोदींना विनंती करणार असल्याचे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP State President Chandrakant Patil) यांनी म्हंटले.

chandrakant patil
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 19, 2021, 9:21 PM IST

Updated : Nov 19, 2021, 10:12 PM IST

कोल्हापूर - पर्याय नाही म्हणून तीन कृषी कायदे मागे(Farm Laws Repeal) घ्यावे लागले आहेत. देशातील अनेक शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते. मात्र, एक विशिष्ट वर्गच याला विरोध करत होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) आज अतिशय दुःखाने कायदे रद्द करण्याबाबतची घोषणा केली, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP State President Chandrakant Patil) यांनी म्हंटले. शिवाय शेतकऱ्यांना समजावून सांगून आपण हे कायदे पुन्हा आणण्याबाबत नरेंद्र मोदींना विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी म्हंटले आहे. ते इचलकरंजी येथे बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • सुख आणि समृद्धी आणणारे कायदे मागे घ्यावे लागले :

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देशातील अनेक शेतकरी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांचे समर्थन करत होते. मात्र, एक विशिष्ट गटच याला विरोध करत होता. सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्यांना वारंवार झापले होते. शिवाय आपण सर्वसामान्यांना वेठीस धरून आपल्या मागण्या मान्य करू शकत नाही असेही कोर्टाने ठणकावून सांगितले होते. मात्र, मोदींनीच शेवटी दुःखाने आज कायदे रद्दबाबत घोषणा केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होते तर त्याला विरोध करायचे काय काम होते. शेतकऱ्यांना आपला माल कुठे विकायचा याचे स्वातंत्र्य मिळणार होते. अजूनही चांगले मुद्दे होते, याला विरोध करायची गरज नव्हती, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

  • सध्यातरी आंदोलन मागे घेणार नाही - टिकैत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) यश आलं. शेतकऱ्यांच्या विजयाचं देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. मात्र, तत्काळ आंदोलन मागे घेत नसल्याचं शेतकरी आंदोलनाचे प्रमुख राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे.

Last Updated : Nov 19, 2021, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.