ETV Bharat / city

Chandrakant Patil visit Ambabai Temple : एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रापासून मी अनभिज्ञ : चंद्रकांत पाटील - देवेंद्र फडणवीस

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. ( Chandrakant Patil visit Ambabai Temple ) कोल्हापूरमध्ये कोणतेही काम किंवा मोहीम करण्याअगोदर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करत असतात. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन सध्या अनेक काही गोष्टी सांगून जातात.

Chandrakant Patil visit Ambabai Temple
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jun 25, 2022, 3:36 PM IST

Updated : Jun 25, 2022, 4:22 PM IST

कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन ( Chandrakant Patil visit Ambabai Temple ) घेतले. कोल्हापूरमध्ये कोणतेही काम किंवा मोहीम करण्याअगोदर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करत असतात. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन सध्या अनेक काही गोष्टी सांगून जातात. मात्र, मी कोणत्या मोहिमेवर निघाले दोन असून राज्यसभा आणि विधान परिषदेत यश मिळू देत अशी मागणी केली होती. त्यामुळे देवीची ओटी भरण्यासाठी आलो आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणे खूपच कॉमन आहे. यामध्ये काहीही विशेष नाही, असेही ते म्हटले.

चंद्रकांत पाटील

राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत यश मिळाले देवीचे दर्शन - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. एखाद्या मोहिमेला जाण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतले आहे का असे विचारले असता, चंद्रकांत म्हणाले, माझी प्रचंड श्रद्धा अंबाबाईवर आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळू दे अशी प्रार्थना आई अंबाबाई चरणी केली होती, त्यानुसार मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळाले. यामुळे आईची ओटी भरण्यासाठी मी सहपरिवार येथे आलो असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मी कोणत्याही मोहिमेवर निघालो नसून पुणे शिर्डीसह अनेक शहरांमध्ये विविध कार्यक्रम असून त्यासाठी मी निघालो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) दिल्लीला झाले हे काय विशेष नाही असे ते म्हणाले आहेत.

मी या सर्वापासून अनभिज्ञ: - शिवसेनेशी बंड केलेले एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक आमदारांच्या परिवाराची सुरक्षा ही सरकारकडून काढून घेण्यात आली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी सरकारला पत्र लिहित खरबरीत टीका केली आहे. याबाबत चंद्रकांत म्हणाले, मी या सर्वापासून अनभिज्ञ आहे. माझ्या घरात सध्या सर्वजण आजारी आहेत. यामुळे मी कोल्हापुरात आलो असून माझे कोणत्याही गोष्टीकडे सध्या लक्ष्य नाही. एकनाथ शिंदे यांनी सरकारला पत्र लिहिण्याचे हे तुमच्याकडूनच कळत आहे, असेही ते म्हणाले आहेत. ( chandrakant patil About Eknath Shinde letter )

आमदारांच्या व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी - सध्या शिवसेनेमध्ये जे काही चालू आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्यामध्ये भाजपचा काहीही सहभाग नाही. तसेच एकनाथ शिंदेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच शिवसेनेला सोडून गेलेला आमदारांच्या सुरक्षेचा व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. या देशात सर्वसामान्य माणसाला जे मनात येतंय ते मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकांना जे काही वाटते. ते बोलतात मात्र या सर्वांनमध्ये भाजप कुठे नाही असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल; निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष

हेही वाचा - Maharashtra Political Crises : बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं..

हेही वाचा - राऊत म्हणाले आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा नसते, राणा यांची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

Last Updated : Jun 25, 2022, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.