ETV Bharat / city

'तो' अ‍ॅलिगेटर मासा अज्ञातानेच सोडला पंचगंगेत? वाचा, किती धोकादायक ठरू शकतो - कोल्हापूर स्पेशल न्यूज

कोल्हापुरातल्या प्रयाग चिखली गावातील शेतकऱ्यांना पंचगंगा नदीमध्ये मासेमारी करत असताना 'ॲलिगेटर गार' प्रजातीचा मासा जाळ्यात सापडला होता. अमेरिकेत आढळणारा मासा पंचगंगा नदीत सापडल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र हा पाळलेला मासा असून त्याला कोणी अज्ञात व्यक्तीनेच नदीमध्ये सोडला असल्याचा अंदाज कोल्हापुरातल्या मत्स्य संगोपन करणाऱ्या व्यक्तींनी केला आहे.

ईटीव्ही भारत विशेष
ईटीव्ही भारत विशेष
author img

By

Published : Jul 19, 2021, 5:43 PM IST

Updated : Jul 19, 2021, 6:40 PM IST

कोल्हापूर - शनिवारी कोल्हापुरातल्या प्रयाग चिखली गावातील शेतकऱ्यांना पंचगंगा नदीमध्ये मासेमारी करत असताना 'ॲलिगेटर गार' प्रजातीचा मासा जाळ्यात सापडला होता. अमेरिकेत आढळणारा मासा पंचगंगा नदीत सापडल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र हा पाळलेला मासा असून त्याला कोणी अज्ञात व्यक्तीनेच नदीमध्ये सोडला असल्याचा अंदाज कोल्हापुरातल्या मत्स्य संगोपन करणाऱ्या व्यक्तींनी केला आहे. दरम्यान, हा मासा नदी आणि तलावात सोडणे किती धोकादायक आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात यावरचा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट.

'तो' ॲलिगेटर मासा अज्ञातानेच सोडला पंचगंगेत?

नदीत सापडलेला 'तो' मासा पाळलेला
कोल्हापुरातील मत्स्य संगोपन करणारे योगेश कागले आणि यशोधन जाधव 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिक केवळ शो साठी विदेशी मासे पाळतात. अनेकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि आकर्षक फिश टँक पाहायला मिळतात. या टँकमध्ये विविध प्रजातीच्या रंगीबेरंगी माशांसह 'ॲलिगेटर गार', टायगर शार्क, पिर्हाना सारख्या माशांना सुद्धा पाळले जाते. प्रयाग चिखलीतील नागरिकांना पंचगंगा नदीत सापडलेला 'ॲलिगेटर गार' हा मासा सुद्धा कोणी अज्ञात नदीमध्ये सोडला असल्याचे म्हटले आहे. एखाद्या फिश टँकमध्ये माशाचा आकार आणि वजन वाढले तर अनेकजण काही पाळलेले मासे नदी आणि तलावात सोडतात. त्यापैकीच हा एक मासा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परदेशातील मासे असे आपल्या नदीमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत आणि ते शक्य सुद्धा नसल्याचे त्यांनी म्हटले.

'ॲलिगेटर गार' मासा नदीत सोडणे किती धोकादायक ?
'ॲलिगेटर गार' हा मासा हिंस्र आणि आक्रमक प्रकारात मोडतो. याचे तोंड मगरीच्या तोंडासारखेच असते. त्यामुळे अचानक पाहिल्यानंतर कोणालाही ही मगर आहे की काय? अशी शंका येऊ शकते. हा मासा हिंस्त्र असल्याने इतर लहान मासे आणि त्यांच्या अंड्यांना सुद्धा भक्ष्य करत असतो. त्याची लांबी 10 ते 12 फूट आणि वजन अंदाजे 80 ते 100 किलोपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे हा मासा नदी आणि तलावामध्ये आढळला तर येथील स्थानिक माशांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. विशेष म्हणजे या माशांची पूर्ण वाढ झालीच तर मात्र माणसांसाठी सुद्धा हा मासा धोकादायक ठरू शकतो. अशी माहितीही योगेश कागले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे काही विदेशी मासे विक्री करतात. जिल्ह्यात फिश टँकमधील रंगीबेरंगी आणि आकर्षक मासे विकणारे व्यावसायिक जवळपास 80 ते 100 च्या आसपास आहेत असेही त्यांनी म्हटले.

'..तर हे मासे आमच्याकडे संगोपनासाठी द्यावे; आम्ही स्वीकारू'
सापडलेल्या 'ॲलिगेटर गार' माशाबाबत माहिती देताना यशोधन जाधव म्हणाले, हा मासा फिश टँकमध्ये पाळून मोठा झाल्यावर कुणीतरी बेजबाबदारपणे नदीमध्ये सोडला आहे. अमेरिकन परिसंस्थेमध्ये सापडणारा हा मासा लगेच कोल्हापुरात सापडतो, हा काही नैसर्गिक चमत्कार किंवा कोल्हापूरची जैवविविधता नाही. हा मासा घरात पाळलेला होता आणि नंतर हा मोठा झाल्याने किंवा नको झाल्याने त्यांनी जवळच्या नदीमध्ये सोडला आहे. अशाप्रकारे हे पाळलेले मासे नदी किंवा तलावात सोडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, हे चुकीचे आहे. मात्र नागरिकांनी असे न करता, हे मासे आमच्यासारख्या काही व्यक्तींकडे संगोपनासाठी दिले तर आम्ही ते स्वीकारू असे म्हटले आहे. शिवाय पाळलेले मासे नदीत सोडण्याचा प्रकार वेळीच थांबवा अन्यथा उद्या टायगर शार्क, पिर्हाना सारखे मासे सुद्धा आपल्या जवळच्या तलाव आणि नद्यांमध्ये सापडतील, अशी भीतीसुद्धा यशोधन जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

मासेमारी करताना सापडला 'ॲलिगेटर गार' प्रजातीचा मासा
दरम्यान, शनिवारी 17 जुलै रोजी कोल्हापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रयाग चिखली गावातील नागरिकांना पंचगंगा नदीमध्ये हा 'ॲलिगेटर गार' प्रजातीचा मासा सापडला होता. पहिल्यांदाच अशा पद्धतीचा मासा सापडल्याने नागरिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले होते. शिवाय, अशा पद्धतीचे मासे नदीमध्ये असतील तर नदीतील इतर माशांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येईल, अशी भीती या सर्वांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - नियम तोडून धबधब्यावर गेलेल्या 117 पर्यटकांना पाण्याने वेढले, अग्निशामक दलाने केली सुटका

Last Updated : Jul 19, 2021, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.