ETV Bharat / city

अखिल भारतीय नौजवान सभेकडून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा - अखिल भारतीय नौजवान सभा

अखिल भारतीय नौजवान सभेकडून कोल्हापूरमधील बिंदू चौक येथे पंतप्रधान मोदींचा वाढदिवस उपरोधिकपणे साजरा करण्यात आला. बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी युवकांकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात येत आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाहीतर आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

pm birthday celebrated by akhil bhartiy naujawan sabha
अखिल भारतीय नौजवान सभेकडून मोंदीचा वाढदिवस साजरा
author img

By

Published : Sep 17, 2020, 3:45 PM IST

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस अखिल भारतीय नौजवान सभेच्यावतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. यावेळी भीक मांगो आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करण्यात आली. देशात बेरोजगारीचे संकट वाढत असताना मोदी सरकारने खासगीकरण सुरू केले आहे. कोरोनामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. हे संकट कायम राहिल्यास बेरोजगार तरुण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सभेने दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून देशात बेरोजगारीचा प्रमाण वाढले आहे. सत्तेत येण्यापूर्वी याच पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन तरुणांना दिले होते. मात्र, या तरुणांची आज फसवणूक झाली आहे. रेल्वेसह आठ शासकीय संस्थांच्या खासगीकरण सुरू आहे, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून देशातील बेरोजगारीचा 22 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आला आहे, असा आरोप गिरीश फोंडे यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारने बेरोजगारीचा भत्ता देखील सुरू केलेला नाही. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत आहोत, असे नौजवान भारत सभेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. हे आंदोलन बिंदू चौक येथे करण्यात आले. प्रशांत आंबी, आरती रेडेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा-सत्तर वर्षांचे झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.