कोल्हापूर - शहरात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून कोणीही घराबाहेर पडू नये असे, आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. या माध्यमातून आज दिवसभरात एकूण 7 लाख 67 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या तब्बल 390 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
आज अशा पद्धतीने केली कारवाई -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. केवळ दूध आणि आरोग्याशी निगडित सेवांना परवानगी देण्यात आली आहे. असे आतानाही अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. दिवसभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून एकूण 7 लाख 67 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- विनामास्क - 587 जणांवर कारवाई
- विनामास्क दंड - 1 लाख 98 हजार रुपये
- विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेले - 1 हजार 319
- एकूण वाहने जप्त - 159
- विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्यांकडून वसूल केलेला दंड - 2 लाख 99 हजार 800 रुपये
- मॉर्निंग वॉक केसेस - 390
- मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांकडून वसून केलेला दंड - 1 लाख 74 हजार 500
- दिवसभरात दुकानांवर केलेल्या कारवाईची संख्या - 24
- दुकानांवर कारवाई करून वसूल केलेला दंड - 91 हजार 500