ETV Bharat / city

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 'आप' लढणार; रिक्षा प्रचाराचा शुभारंभ

author img

By

Published : Feb 4, 2021, 3:17 PM IST

महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष पहिल्यांदाच उतरत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबविण्यात आली, त्याच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात 'चाय पे चर्चा' आणि 'लोकवर्गणीतून महानगरपालिका निवडणूक' असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे, तसे सर्वच पक्ष आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी पुढे येताना आता पाहायला मिळणार आहेत. आम आदमी पक्षाने आत्तापासूनच प्रचाराला सुरुवात केली असून आज ऐतिहासिक बिंदू चौक येथून रिक्षा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पक्षाची ध्येय आणि उद्दिष्टे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील सर्वच 81 प्रभागात आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर

पक्षाच्या वतीने विविध उपक्रम -

महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष पहिल्यांदाच उतरत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबविण्यात आली, त्याच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात 'चाय पे चर्चा' आणि 'लोकवर्गणीतून महानगरपालिका निवडणूक' असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये फिरून लोकवर्गणी सुद्धा गोळा करण्यात आली आहे. याला मिळालेला प्रतिसाद पाहून आता पक्षाचा प्रसार आणखीन कसा होईल त्यादृष्टीने रिक्षा प्रचाराला आजपासून सुरुवात करण्यात आली.

येथील ऐतिहासिक बिंदू चौकातून या प्रचाराला शुभारंभ झाला असून शहरातील प्रत्येक भागात अनेक रिक्षाचालकांना आपल्या सोबत जोडणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी प्रचार प्रमुख संदीप देसाई यांच्यासह जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, संतोष घाटगे, सुरज सुर्वे, आदम शेख आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.