कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण (Kolhapur Omicron News) संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. एवढ्या दिवस शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण आता ग्रामीणमध्ये सुद्धा पाहण्यास मिळत आहेत. आज (ता.५) रोजी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत आणखी ४ बाधितांची भर पडली आहे.यामध्ये २ रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत व २ ग्रामीण मधील आहेत.यामध्ये कळंब्यातील १, नागाळा पार्कातील १, गडहिंग्लज येथील २ असे एकूण ४ ओमायक्राॅनचे रुग्ण आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आता ओमायक्राॅन रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. दररोज वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे महानगरपालिका प्रशासन कामाला लागली असल्याचे कोल्हापूर महानगर पालिका उपयुक्त रविकांत अडसूळ यांनी ईटीव्हीशी (Etv Bharat) बोलताना सांगितले आहे.
जिल्ह्यात ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण
दिवसेदिवस महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात ओमायक्रॉन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात देखील व ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण बनलेले आहे. आज जिल्ह्यात व ओमायक्रोनचे नवे चार रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन रुग्ण हे महानगर पालिका हद्दीतील आहेत तर दोन रुग्ण आहे ग्रामीण भागातील आहेत. महानगरपालिका हद्दीतील नागाळा पार्क येथील ३६ वर्षीय एक व्यक्ती ओमायक्राँन पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल ३० डिसेंबर २०२१ रोजी पॉझिटिव्ह होता. सौम्यलक्षण असल्याने व कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्याचे नमुने जीनोम स्क्विन्सिंग साठी पुण्याला पाठवण्यात आलेले होते.सदर व्यक्ती काही दिवसापूर्वी कोल्हापूर ते कलकत्ता असा प्रवास केलेला होता. तर सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा कळंबा परिसरातील ७५ वर्षीय व्यक्ती असून त्यांचा देखील ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.सदर संपर्कात आलेल्या १० पैकी ५ व्यक्तिंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर तीन रुग्णांचे अहवाल पुढे जीनोम स्क्विन्सिंग पुण्याला पाठवण्यात आलेले आहेत. सदर व्यक्तीचे कोणतेही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही.
ग्रामीण भागात दोन रुग्ण ओमायक्रोन बाधित
ग्रामीण भागातील महागाव गडिंग्लज येथील ४६ वर्षीय व्यक्ती ओमायक्रोन पॉझिटिव्ह आलेला आहे सदर व्यक्ती डॉक्टर असून तो गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास केलेला होता. तसेच ३६ वर्षीय अजून एका व्यक्तीचा ओमायक्रोन पॉझिटिव्ह असून तो केनिया देशातून प्रवास करून आलेला होता.सदर चारही रुग्णांचा रिपोर्ट आल्याचे कळताच प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तर सदर भाग हा कंटेंटमेन झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.
महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज
वाढत्या ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्यामुळे महानगरपालिका सज्ज असल्याचे महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले आहे. शहरी भागातील रुग्ण संख्या बघता महापालिकेच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत. शहरात विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच लोकांना सोशल डिस्टंसिंग मेण्टेन करण्यासाठी तसेच मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती देखील केली जात आहे. मात्र जे हे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जात असल्याचे उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले आहे.
लसीकरण वाढवण्यावर महपालिकेचे भर
वाढत्या ओमायक्रॉनच्या संख्येमुळे शंभर टक्के लसीकरणाला आम्ही प्रोत्साहन देत असल्याचे अडसूळ यांनी सांगितले आहे. पहिला डोस झालेल्या ९५ टक्के लोकांचे प्रमाण असून त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आलेला असून येत्या दोन ते तीन दिवसात पन्नास टक्के लसीकरणाचा टप्पा आम्ही पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बंद केलेली क्वारंटाईन सेंटर पूर्ण कार्यान्वित करणार
पहिल्या आणि दुसर्या लाटेचा अनुभव पाहता हा ओमायक्रोनचा तिसरी लाट ही अधिक घातक असून दीडपट जास्त वेगाने रुग्ण संख्या वाढेल असा अंदाज घेत शहरातील बंद केलेली सर्व क्वारंटाईन सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून तीन क्वारंटाईन सेंटर पुन्हा चालू करण्यात येणार आहेत.यामध्ये शिवाजी विद्यापीठातील डी ओ टी कॉलेज येथील वसतिगृह, महासैनिक दरबार हॉल आणि हॉकी स्टेडियम येथील सेंटर चालू करण्यात येणार आहेत.
ऑक्सिजनचा पुरेसासाठा ठेवण्यावर भर
कोरोनाच्या दुसऱ्याला ठेवते ऑक्सिजनची कमी तुटवडा अधिक प्रमाणात जाणवलेला होता यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. येणाऱ्या तिसऱ्या लाटेला झुंज देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडर तसेच आयसोलेशन हॉस्पिटल येथे बसवण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांट हा सुस्थितीत ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून ऑक्सिजनची कमी भासू नये याची पुरेपूर काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे असे उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; एकूण रुग्णसंख्या 26 हजार