कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघाची अर्थात गोकुळची निवडणूक होत आहे. 26 मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. बुधवारी 30 मार्च पर्यंत एकूण 218 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये आज आणखीन 71 अर्जांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण 289 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता आणखीन किती अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम -
उमेदवारी अर्ज दाखल करणे | 25 मार्च ते 1 एप्रिल |
उमेदवारी अर्जांची छाननी | 5 एप्रिल |
पात्र उमेदवारांची यादी | 6 एप्रिल |
अर्ज माघारी घेण्याची मुदत | 6 एप्रिल ते 20 एप्रिल |
उमेदवारांची अंतिम यादी तसेच चिन्हे वाटप | 22 एप्रिल |
मतदान | 2 मे |
मतमोजणी | 4 मे |