ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज नव्याने दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची संख्या ६० वर पोहोचली आहे.
यातील एक रुग्ण डोंबिवली पश्चिममधील असून तो ४९ वर्षाचा आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण कशाप्रकारे झाली, यासंदर्भात पालिका अधिकारी माहिती घेत आहेत.
तर दुसरा रुग्ण ३३ वर्षांचा असून तो कल्याण पश्चिम परिसरात वास्तव्यास आहे. हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने दोन्ही रुग्ण सापडलेला परिसर सील केला आहे. यामुळे कल्याण-डोंबीवलीतील रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने एकून आकडा ६० झाला आहे. यापैकी ३७ रुग्ण डोंबिवलीतील आहेत. तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.
महापालिका क्षेत्रात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ असून आतापर्यंत २० जण बरे झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली पूर्व-३० रुग्ण, तर पश्चिमेला ९ रुग्ण आढळले आहेत.तसेच कल्याण पूर्वमध्ये १३ तर पश्चिमेला ८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. याचसोबत टिटवाळा आणि मोहने गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडलीय.