ETV Bharat / city

देवीच्या मंदिरातील दागिन्यांसह मूर्तींची चोरी; मुद्देमालासह अल्पवीयन त्रिकुट ताब्यात - काली माता मंदिर

मंदिरात चोरी झाल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत होता, त्यानंतर चोराला अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. त्यातच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल रजपूत यांनी पथकासह चोरट्यांचा शोध सुरू केला. अल्पवयीन चोरटे उल्हासनगर ५ नंबर येथील कैलाश नगर मधील असल्याचे समजताच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

मंदिरातील दागिन्यांसह मूर्तींची चोरी
मंदिरातील दागिन्यांसह मूर्तींची चोरी
author img

By

Published : Jun 11, 2021, 7:04 AM IST

ठाणे - उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प येथील जय अंबे मंदिरात दानपेटीसह सोन्या चांदीच्या मूर्ती, असा सव्वा लाखाचा ऐवज बुधवारी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने ४ तासातच मंदिरातील दागिने व मुर्ती चोरी करणाऱ्या ३ अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मंदिरातील लंपास केलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.

देवीच्या मंदिरातील दागिन्यांसह मूर्तींची चोरी;
सीसीटीव्ही फुटेजमुळे चार तासातच चोरीचा छडा-

उल्हासनगर कुर्ला कॅम्प काली माता मंदिर मागे जय अंबे मंदिर असून बुधवारी दिवसा अज्ञात चोरट्याने ४० ग्रॅम सोन्या-चांदीच्या मूर्ती, रोख रक्कम व इतर वस्तूसह दानपेटी अशी एकूण सव्वा लाखाची चोरी केली होती. मंदिरात चोरी झाल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत होता, त्यानंतर चोराला अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. त्यातच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल रजपूत यांनी पथकासह चोरट्यांचा शोध सुरू केला. अल्पवयीन चोरटे उल्हासनगर ५ नंबर येथील कैलाश नगर मधील असल्याचे समजताच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

मंदिरातून लंपास केलेला मुद्देमाल सापडला भंगारवाल्याकडे-

या अल्पवयीन चोरट्यांनी मंदिरातील दागिने व मूर्ती आणि इतर साहित्य उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-४ भागातील कुर्ला कॅम्प येथील भंगारवाला शकील दोस्त मोहंमद अहमद याला विक्री केल्याचे पोलीस तपासत समोर येताच पोलिसांनी भंगाराच्या दुकानातून मुद्देमाल हस्तगत करीत शकीलला अटक केली आहे. तर अल्पवयीन चोरट्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधार गृहात केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.