ETV Bharat / city

कोरोनाचा हाहाकार; कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात आढळले तब्बल ४३६ रुग्ण

कल्याण डोंबिवलीत एकाच दिवशी ४३६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १६ दिवसात रुग्णांनी ओलंडला साडेतीन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार १२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३ हजार ७९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी आढळून आलेले ४३६ रुग्णापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत महापालिका हद्दीत ५ हजार ३०९ रुग्णांची नोंद असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

kdmc
कोरोनाचा हाहाकार; कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात आढळले तब्बल ४३६ रुग्ण
author img

By

Published : Jun 28, 2020, 1:26 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्याप्रमाणत संख्या वाढत असतानाच शनिवारी मात्र एकाच दिवशी ४३६ रुग्ण आढळून आले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य विभाग यंत्रणासह संबंधित सर्वच यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे १२ जून ते २७ जूनपर्यंत या १६ दिवसाच्या कालावधीत ३ हजार ६१३ कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ झाली आहे.

गेल्या १६ दिवसांपासून आजपर्यंत प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले आहे. तर कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. १६ दिवसामध्ये कल्याण डोंबिवलीतील सलग १३ दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येने डबल शंभरीचा आकडा पार केला. तर दोन दिवस सतत तीनशेच्या आकडा पार केला होता. शनिवारी मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असून तब्बल ४३६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर आतापर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार १२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३ हजार ७९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी आढळून आलेले ४३६ रुग्णापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यत महापालिका हद्दीत ५ हजार ३०९ रुग्णांची नोंद असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रुग्णांची संख्या १२ जून रोजी १८५ ,१३ जूनला १६०, १४ जून रोजी १०१, १५ जून १५५, १७ जून रोजी १३५, १८ जून रोजी २१२, १९ जूनला २३६ तर २० जून रोजी २४३, २१ जूनला २५४, २२ जून २५६, २३ जून २०२, २४ जून २२६, २५ जून ३२३, २६ जून ३५८, तर शनिवारी २७ जून रोजी ४३६ असे केवळ १६ दिवसात एकूण ३ हजार ६१३ रुग्णांची वाढ झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर होऊन रुग्णांनी ५ हजाराचा ठप्पा ओलांडला आहे. त्यातच पावसाळ्याच्या सुरवातीलाच कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे. तसेच नागरिकांनी सरकारने आणि पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे क्रमप्राप्त झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. मात्र शहरात नागरिकांकडून सूचनांचे पालन सूचनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून आले आहे.

शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक रुग्णांची संख्या कल्याण पश्चिममध्ये असून शनिवारी देखील या परिसरात १४८ रुग्ण तर कल्याण पूर्वेत १०५ आणि डोंबिवली पूर्व भागात १०६ तर डोंबिवली पश्चिमेत ४४, आणि टिटवाळा - मांडा परिसरात ३३ असे एकूण ४३६ रुग्ण एका दिवसात आढळून आल्याने शहरातील परिस्थिती प्रशासनाच्या हाता बाहेर गेल्याचे दिसून आले. तर ४३६ रुग्नांमध्ये ४४ अल्पवयीन मुलामुलींचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.