ETV Bharat / city

दोन सख्ख्या भावांचा खून व तिसऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दुहेरी जन्मठेप - कल्याण कोर्टाकडून आरोपीला दुहेरी जन्मठेप

दोन सख्ख्या भावांचा खून व तिसऱ्या भावास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला १२ वर्षानंतर दुहेरी जन्मठेप व १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. संजय नामदेव पाटील, (वय ३८, रा. रामदासवाडी, कल्याण ) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

kalyan
कल्याण कोर्ट
author img

By

Published : Mar 11, 2022, 3:01 PM IST

ठाणे - दोन सख्ख्या भावांचा खून व तिसऱ्या भावास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला १२ वर्षानंतर दुहेरी जन्मठेप व १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. संजय नामदेव पाटील, (वय ३८, रा. रामदासवाडी, कल्याण ) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेला मनोज शंकर खांडगे, (वय ३७) याचा मृत्यू झाला आहे. अशोक यशवंत देवकर (वय ४०), कृष्णा यशवंत देवकर (वय ३२), असे निर्घृण हत्या झालेल्या भावांची नावे असून, रामदास यशवंत देवकर (वय ४२) असे हल्ल्यातून बचावलेल्या तिसऱ्या भावाचे नाव आहे.

दोन्ही हल्लेखोरांनी तिघांवर केले चाकूने वार -

कल्याण पश्चिम भागातील रामदासवाडी परिसरात मृतक देवकर बंधू राहत होते. ३ डिसेंबर २०१० रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास रामदास देवकर त्यांचे भाऊ अशोक, आणि कृष्णा रात्रीचे जेवण करून त्यांच्या घराच्या बाहेर गप्पा मारत बसले असतांना त्याच परिसरात राहणारा आरोपी संजय नामदेव पाटील, आणि त्याचा साथीदार मनोज शंकर खांडगे हे दोघे दुचाकीवरून आले. त्यानंतर मागील झालेल्या भांडणाचा मनात राग धरून आरोपी संजय पाटील याने धारदार चाकुने दोघा भावांच्या गळयावर, छातीवर, पोटावर वार करून गंभीर दुखापती करून निघृण हत्या केली. तर तिसरा भाऊ रामदास यांच्या हातावर, पोटावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०१० रोजी भा.दं.वि.कलम ३०२,३०७,३२६,५०६,३४ प्रमाणे दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल झालेल्या दिवशीच तत्कालीन पोलीस निरीक्षक एन के. बानकर, पोलीस निरीक्षक आर. एम. आव्हाड यांनी आरोपीचा शोध घेऊन दोघानांही अटक केली होती.

न्यायालयीन सुनावणी दरम्यान एका आरोपीचा मृत्यू -

तत्कालीन तपास अधिकारी यांनी आरोपी विरूध्द् सबळ व भक्कम पुराव्याअंती कल्याण जिल्हा सत्र न्यायालय दोषारोप पत्र दाखल केले. तर गुन्हयाची न्यायालयात सुनावणी सुरु असताना दरम्यानच्या कालावधीत या गुन्ह्यातील आरोपी मनोज शंकर खांडगे याचा मृत झाला. या गुन्हयाची सुनावणी सुरु असताना न्यायालयाने हल्ल्यातून बचावलेला फिर्यादी, पंच, साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवुन परिस्थीतीजन्य पुरावा व वस्तुस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी संजय नामदेव पाटील याला दोन्ही भावांच्या खुनाच्या आरोपाखाली व फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७ अंतर्गत दंडनीय गुन्हयासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता कलम २३५(२) नुसार दोषी ठरवण्यात आले.

अशी सुनावली न्यायालयाने शिक्षा -

अशोक यशवंत देवकर यांच्या खुनासाठी जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा व. (वीस हजार रूपये) दंड, दंड न भरल्यास ६ महीने सश्रम कारावास भोगावा लागेल. कृष्णा यशवंत देवकर, यांच्या खुनासाठी जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा व (वीस हजार रूपये) दंड, दंड न भरल्यास ६ महीने सश्रम कारावास भोगावा लागेल. तर हल्ल्यातून बचावलेले रामदास देवकर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.द. वि.कलम ३०७ अन्वये १०वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये . दंड, दंड न भरल्यास ६ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिन्ही गुन्ह्यातील शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील आणि आरोपी कारावासाच्या कालावधीत कोणत्याही माफीसाठी पात्र राहणार नाही. असा अंतिम निकाल जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे, ( DJ-1 कल्याण ) यांनी निर्णय दिला आहे. सदर दाव्यात सरकारी वकील म्हणून श्रीमती अश्वीनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला. कोर्ट पैरवी अंमलदार म्हणुन पोलीस नाईक दिपक पिंगट, शशीकांत गांगुर्डे यांनी कामकाज केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.