कल्याण-डोंबिवली ( ठाणे ) - टाळेबंदीमुळे बेरोजगार ( Unemployment ) झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली ( Man Commits Suicide )आहे. ही घटना पश्चिम डोंबिवलीतील घनश्याम गुप्ते रोड येथे घडली आहे. दशरथ चंद्रकांत पतंगराव (वय 40 वर्षे), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
केबलला लटकून गळफास घेण्याचा प्रयत्न - डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडला असलेल्या रोहिणी अपार्टमेंटमध्ये दशरथ हा त्याच्या परिवारासह राहत होता. एकीकडे त्याची प्रकृती बरी नव्हती तर दुसरीकडे टाळेबंदीमुळे बेरोजगार असल्याने त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्याला कंटाळून त्याने मंगळवारी (दि. 18 जानेवारी) रात्री 12 च्या सुमारास त्याने राहत्या घराच्या इमारतीवर गेला. तेथे गच्चीवरून जाणाऱ्या केबलला लटकून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण, ती वायर अचानक तुटल्याने दशरथ इमारतीवरून खाली पजला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात ( Vishnu Nagar Police Station ) नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Man Commits Suicide : डोंबिवलीत बेरोजगारीला कंटाळून 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या - गळफास घेण्याचा प्रयत्न
टाळेबंदीमुळे बेरोजगार झालेल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली ( Man Commits Suicide ) आहे. इमारतीच्या गच्चीवरील केबलने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, केबल तुटल्याने तो इमारतीवरुन पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
![Man Commits Suicide : डोंबिवलीत बेरोजगारीला कंटाळून 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या Man Commits Suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14227749-thumbnail-3x2-asd.jpg?imwidth=3840)