ETV Bharat / city

कोरोनाच्या नावे नागरिकांची लूट.. अधिकार नसतानाही क्लिनअप मार्शलकडून दंडवसुली, गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 27, 2020, 7:33 AM IST

Updated : Sep 27, 2020, 8:21 AM IST

कल्याण डोंबिवलीमध्ये नियुक्त कऱण्यात आलेले 'क्लिनअप मार्शल' नागरिकांकडून त्याबाबतच्या दंडाची वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विना मास्क फिरणाऱ्यांकडून हे जबरदस्तीने दंड आकारत होते. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत अशा क्लिनअप मार्शलला रंगेहात पकडले आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

clean-up marshals of Kalyan
क्लिनअप मार्शलकडून दंडवसुली

ठाणे - कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यासह परिसरात उघड्यावर कचरा आणि घाण फेकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केडीएमसीने नेमलेले क्लिनअप मार्शल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे कोणतेही अधिकार नसतानाही हे 'क्लिनअप मार्शल' नागरिकांकडून त्याबाबतच्या दंडाची वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केडीएमसीत क्लीन मार्शलचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तर पोलीस अन्य तीन आरोपींचा शोध घेत आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसर कचरा आणि घाणमुक्त राहण्यासाठी केडीएमसीने याठिकाणी ठेकेदारामार्फत क्लिनअप मार्शल नियुक्त केले आहेत. स्टेशन परिसरातील रस्त्यावर पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणाऱ्या, थुंकणाऱ्या किंवा कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुलीचे प्रमूख अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. मात्र ही जबाबदारी सोडून हे क्लिनअप मार्शल कोरोनाबाबतचे नियम न पाळल्याच्या नावाखाली नागरिकांकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करत असल्याच्या तक्रारी मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांच्याकडे आल्या होत्या.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी भोईर हे मनसे कार्यकर्त्यांसह शनिवारी सकाळी कल्याण स्टेशन परिसरात दाखल झाले आणि त्यांनी अशा प्रकारची बेकायदेशीर वसुली करताना क्लिन अप मार्शलला रंगेहात पकडले. मास्क लावला नाही. म्हणून एका नागरिकाकडून 500 ते 1 हजार रुपये हा क्लिनअप मार्शल उकळत असल्याचे दिसून आले. या क्लिनअप मार्शलला पकडून भोईर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या कारवाईत २४६ नागरिकांना दंड

शुक्रवारी दिवसभरात महापालिका क्षेत्रात मास्क परिधान न केलेल्या 246 नागरिकांकडून रक्कम रुपये 1 लाख 23 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आपल्या चेहऱ्यावर मास्क व कापड परिधान करावे, तसेच महापालिका क्षेत्रातील दुकानदारांनी सायंकाळी 7 वाजता दुकाने बंद करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Last Updated : Sep 27, 2020, 8:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.