ठाणे - मनसेची ताकत असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील अनेक मनसे पदाधिकरी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत मनसेला रामराम केला आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीतील मनसेचे ३ माजी नगरसेवक ( 3 former MNS corporators join Shiv Sena Kalyan-Dombivali ) आणि पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज ( शुक्रवारी ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Uddhav Thackeray and Guardian Minister Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीत मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
'या' पदाधिकाऱ्यांनी केले प्रवेश : मनसे सोडून शिवसेनेत दाखल झाल्यामध्ये माजी नगरसेविका पूजा पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील, माजी नगरसेवक तथा जिल्हा सचिव प्रकाश माने, डोंबिवली शहर संघटक संजीव ताम्हाणे तसेच पदाधिकारी सुभाष पाटील, अण्णा पांडे, निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे, विठ्ठल शिंदे, विद्यार्थी सेनेचे प्रवीण परदेशी आणि संदीप मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे शिवसेनेकडून दबावाचे राजकारण सुरू असून अनेक नगरसेवकांना धमकी दिली जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकून पक्ष प्रवेश करण्यास भाग पाडले जात असल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आरोप केला आहे.
राजकीय घडामोडींना वेग : २०१५ च्या निवडणुकीत मनसेचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर पालिकेत मनसेचे विरोधीपक्ष नेता पद भूषविणारे मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आता पुन्हा मनसेच्या तीन माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिका क्षेत्रातील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे.
हेही वाचा - Warrant against Raj Thackeray : ८३ वेळा तारखा, सततची गैरहजेरी राज ठाकरेंच्या विरोधात अखेर अटक वाॅरंट