ETV Bharat / city

Youth Start Tea Business : नोकरी सोडून युवकाने सुरू केला 'बदनाम' चहाचा व्यवसाय

author img

By

Published : Dec 29, 2021, 10:24 PM IST

उच्च शिक्षण घेतल्यानंतर एका चांगल्या कंपनीत नोकरी करावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, उच्च शिक्षण घेऊन छोटा समजला जाणारा एखादा व्यवसाय केला तर, त्याला काही लोक नाव ठेवतात. पण, या कोणत्याच गोष्टीची परवा न करता विदेशी कंपनीत भक्कम पगार घेणाऱ्या एमटेक झालेल्या युवकाने नोकरी सोडून 'बदनाम चहा' ( Badnaam Chay, Aurangabad ) चा व्यवसाय ( Youth Start Tea Business ) सुरू केला. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद - उच्च शिक्षण घेतल्यानंतर एका चांगल्या कंपनीत नोकरी करावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, उच्च शिक्षण घेऊन छोटा समजला जाणारा एखादा व्यवसाय केला तर, त्याला काही लोक नाव ठेवतात. पण, या कोणत्याच गोष्टीची परवा न करता विदेशी कंपनीत भक्कम पगार घेणाऱ्या एमटेक झालेल्या युवकाने नोकरी सोडून 'बदनाम चहा'चा व्यवसाय ( Youth Start Tea Business ) सुरू केला. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

उच्च शिक्षित तरुण झाला चहावाला

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या तुषार शिंदे यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून चहाच्या व्यवसायात प्रवेश केला. आयआयएससी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरु येथे आर्टिफिशिअल इंटेलिजंटमध्ये ( Artificial Intelligent ) त्याने एम.टेक. पूर्ण केले. त्यानंतर एका फ्रेंच कंपनीत डेटा सायन्टिस म्हणून त्याने कामही सुरू केले. मोठ्या पगाराची नोकरी असूनही नोकरदार न होता व्यवसाय करून जगायचे, असा माणस त्याचा होता. म्हणून त्याने आपली नोकरी सोडून चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन महिने त्याने चहामध्ये काय वेगळेपण देता येईल यासाठी अभ्यास केला. त्यानंतर त्याने स्वतःचा "बदनाम चहा" ( Badnaam Chay, Aurangabad ) नावाचा व्यवसाय सिडकोच्या कॅनॉट परिसरात सुरू केला.

यामुळे ठेवले "बदनाम चाय" नाव

उच्च शिक्षण घेऊनही तुषार चांगली नोकरी सोडून चहाचा व्यवसाय सुरू करायचाय असे म्हणताच, त्याच्या कुटुंबीयांनी त्यास नकार दिला. एवढे शिक्षण घेतल्यावर जर चहावाला झाला, तर लोक काय म्हणतील. आपल्या कुटुंबाचा नाव बदनाम होईल, समाजात बदनामी होईल, असे म्हणत कुटुंबीय विरोध केला. मात्र, ज्यांच्या विरोधाला ही सकारात्मक दृष्टीने घेत आपल्या चहाच्या ब्रँडला "बदनाम", असे नाव द्यायचे ठरवले. सहा महिन्यांपूर्वी बदनाम चहाची निर्मिती केली. आज हेच नाव शहरांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाला आहे.

मित्रांची मिळाली साथ

तुषार चहाचा व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करत असताना कुटुंबीय नाराज होते. मात्र, मित्रांनी साथ दिली. अभिषेक कुलकर्णीने त्याला साथ दिली. चहाचा लोगो, नावाच्या डिझाइन पासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अभिषेक तुषार सोबत राहिला. दोघांनी मिळून "बदनाम चहा" ची आपली पहिली ब्रांच सुरू केली. चहाच्या वेगळेपणामुळे रोज एक हजार कपपर्यंत विक्री होत असून अजून मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढेल, असा विश्वास अभिषेक आणि तुषार यांनी व्यक्त केला.

'हे' आहे चहाचे वेगळेपण

चहाचे हॉटेल म्हटलं की कप, काचेचे ग्लास अथवा प्लास्टिकचे कप हे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, औरंगाबादच्या बदनाम चहामध्ये मातीच्या कुल्लडमध्ये चहा दिला जातो. एकदा वापरले की कुल्लड फेकून दिले जातात. सध्या कोरोना काळामध्ये संसर्ग वाढू नये, यासाठी कुल्लडचा वापर केला जातो आहे. प्लास्टीकच्या कपात चहा देताना चहाची चव बदलते, तर काचेच्या कपात चहा दिल्याने संसर्ग होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे कुल्लड वापरण्यात येत असून यामध्ये नफा कमी होत असला तरी नागरिकांच्या आरोग्यासाठी कुल्लडचा वापर करत असून त्याचा एक वेगळा आनंद ग्राहकांना मिळतो. चहा ओतल्यावर मातीच्या कुल्लडमुळे पहिल्या पावसात चहा पिल्याचा आनंद नागरिकांना मिळतो, असे मत तुषारने व्यक्त केले.

"बदनाम चहा"च्या माध्यमातून होते सामाजिक कार्य

चहा पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आपल्या आवडीचं गाणं ऐकण्याची संधी बदनाम चहाने दिली आहे. मात्र त्यासाठी दोन रुपये एवढा शुल्क आकारला जातो. हा शुल्क चहाच्या स्टॉलवर ठेवलेल्या एका डब्यामध्ये टाकावे लागतात. मिळालेले पैसे सामाजिक कार्यासाठी घेतले जातात. गरजूंना आनंद मिळावा यासाठी हे पैसे वेगळे ठेवण्यात येतात. त्याचबरोबर बाजूला एक बॉक्स तयार केला असून, आपल्याकडील वापरात नसलेले चांगले कपडे त्या बॉक्समध्ये टाकण्याची विनंती केली जाते. गरजूंना हे कपडे पोहोचवण्याचे काम केले जाते. अभिषेक आणि तुषार यांनी 'व्ही केअर' नावाचा एक ग्रुप तयार करून, टाळेबंदीमध्ये गरजूंना अन्न पोहोचवण्याचे काम केले. तसेच घाटी रुग्णालयातील गरीब रुग्णांना चार महिने एक वेळचे जेवण देण्याचे काम या दोघांनी केल आहे. त्यामुळे व्यावसायासह सामाजिक जाण असलेल्या या युवकांचे आकर्षण सध्या शहरात वाढताना दिसून येत आहे.

हे ही वाचा - Aurangabad Municipal Council : आगामी निवडणुका स्थगित होण्याची शक्यता; मराठवाड्यात 47 नगरपरिषदेत प्रशासकांची नेमणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.