ETV Bharat / city

चार्ली चॅप्लीनचा मूक अभिनय करून 'तो' देतो मतदान जनजागृतीचा संदेश - सोमनाथ स्वभावाने

औरंगाबादमधील प्रचार सभा असोत की सार्वजनिक ठिकाण हा चार्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

चार्ली मतदान जागृती करताना
author img

By

Published : Apr 19, 2019, 3:10 PM IST

Updated : Apr 19, 2019, 3:37 PM IST

औरंगाबाद - सामाजिक संदेश देणारी घोषवाक्य आणि कार्यक्रम अनेकांना कंटाळवाणे वाटतात. अशा स्थितीत शहरातील एक तरुण चार्लीच्या विविध कलांच्या साह्याने नागरिकांना हसवत मतदान करण्याचे आवाहन करतो. नागरिकांकडून त्याच्या अनोख्या मतदान जागृतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

औरंगाबादमधील प्रचार सभा असोत की सार्वजनिक ठिकाण हा चार्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्यक्ती कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. तर औरंगाबादसह राज्यात अनेकांना परिचित असलेला ज्यनुअर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावाने हा आहे. मतदान करा, मतदानाच्या दिवशी गावाला जाऊन नका. झोपून राहू नका, योग्य उमेदवार द्या, अशी तो जगनजागृती करत आहे. नागरिक चार्लीसोबत स्लेफी काढून मतदान करणार असल्याचे आश्वासन देत आहेत.

चार्ली मतदान जागृती करताना

मतदाना जागृतीचा प्रभावी संदेश-
चार्ली चॅप्लिनच्या वेशात सोमनाथ हा शहरात असणाऱ्या सर्वच पक्षांच्या जाहीर सभांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मतदान जागृती करताना दिसत आहे. कधी आपल्या अनोख्या सायकलवर स्वार होऊन तर कधी नागरिकांसोबत नृत्य करतो. तो मतदान करा असे आपल्या मूक अभिनयातून सर्वांना सांगत आहे. ज्युनियर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावानेवर चार्लीच्या जीवनाचा खूप प्रभाव आहे. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींमुळे सोमनाथ प्रभावित आहे. त्यामुळे त्याच्यासारखे जगायचे आणि हसवत राहायचे हा त्याचा छंद आहे. चार्लीच्या वेशात आल्यावर सोमनाथ पूर्णतः त्याच्यासारखा वागू लागतो. जोपर्यंत चार्लीच्या भूमिकेत आहे, तोपर्यंत तो कोणासोबतही बोलत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून चार्लीच्या भूमिकेत तो मतदानासाठी जनजागृती करत आहे. त्याच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Feed send from mojo
Slug - mh_aur_1_19apr_charli_campain

Web mojo वरून स्क्रिप सेंड होत नसल्याने मेलवर पाठवत आहे.

बातमीत हिंदी बाईट देखील पाठवला आहे.

औरंगाबादेत मतदान जनजागृतीसाठी चक्क चार्ली चॅप्लिन रस्त्यावर अवतरला आहे. मतदान करा मतदानाच्या दिवशी गावाला जाऊन नका, जोपून राहू नका, योग्य उमेदवार द्या अशी जगनजागृती करत असून, जनजगृती करत असताना नागरिक चार्ली सोबत स्लेफी काढून मतदान करणार असल्याचं अश्वसन देत आहेत. 

औरंगाबादच्या प्रचार सभा असोत कि सार्वजनिक ठिकाण एक माणूस सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे. हि व्यक्ती कोणता नेता किंवा कोणत्या पार्टीचा कार्यकर्ता नसून हि व्यक्ती आहे चार्ली चॅप्लिन. औरंगाबादसह राज्यात अनेकांना परिचित असलेला जुनियर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावाने सध्या मतदान जनजागृती करतोय. चार्ली चॅप्लिनच्या वेशात सोमनाथ शहरात असणाऱ्या सर्वच पक्षांच्या जाहीर सभांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मतदान जागृती करताना दिसतो. चार्लीच्या विविध कलांच्या साह्याने नागरिकांना हसवत तो मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना करतोय. कधी आपल्या अनोख्या सायकलवर स्वर होऊन तर कधी नागरीकांसोबत नृत्य करत तो मतदान करा असं आपल्या मूक अभिनयातून सर्वाना सांगतोय. जुनियर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावानेवर चार्लीच्या जीवनाचा खूप प्रभाव आहे. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींमुळे सोमनाथ प्रभावित आहे. त्यामुळे त्याच्यासारखं जगायचं आणि हसवत राहीचा हा त्याचा छंद झाला. चार्लीच्या वेशात आल्यावर सोमनाथ पूर्णतः त्याच्यासारखा वागू लागतो. जो पर्यंत चार्लीच्या भूमिकेत आहे तो पर्यंत तो कोणासोबत कोणासोबत बोलत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून चालरीच्या भूमीत जगणारा जुनियर चार्ली आता लोकांमध्ये जनजागृती करतोय. मतदान करा, घरी झोपू नका, सुटी आहे म्हणून गावाला जाऊ नका, असं आवाहन तो आपल्या अभिनयातून नागरिकांना करतोय. त्याच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक त्याच्या सोबत सेल्फी कडून मतदान करणार असा विश्वास त्याला देत आहेत.  

Last Updated : Apr 19, 2019, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.