ETV Bharat / city

सुपरवायझरकडे तक्रार करणारे करतो म्हणणाऱ्या कामगारावर चाकूने वार - Aurangabad latest news

सुपरवायझरकडे तक्रार करणारे करतो म्हणणाऱ्या कामगारावर चाकूने वार केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Apr 14, 2021, 3:23 PM IST

औरंगाबाद - सुपरवायझरकडे तुझी तक्रार करतो असे म्हणणाऱ्या कामगारास दुसऱ्या कामगाराने चाकूचे वार करून जखमी केल्याची घटना वाळूज एमआयडीसीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय राजेंद्र टाक (वय ३३, रा. गजानन हौसिंग सोसायटी, बजाजनगर) हे वाळूज येथील लक्ष्मी बॉडी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. कंपनीत त्यांच्यासोबत काम करणारा सचिन लक्ष्मण परदेशी हा काम करताना अजय यांची नेहमी मस्करी करायचा. अजय टाक हे रात्रपाळीत कंपनीत काम करत असताना सचिन याने पुन्हा त्यांची मस्करी केली. यावेळी अजय याने तू जर पुन्हा मस्करी केली तर तुझी तक्रार सुपरवायझरकडे करीन, असे त्याला सांगत असताना सचिन त्याला तुला उद्या मी नक्की मारणार असे म्हणाला.

नाइट शिफ्ट करून अजय कंपनीतून दुचाकीवरून घराकडे जात असताना एफडीसी कॉर्नरजवळ सकाळी सव्वाआठच्या सुमारास सचिन याने अजयची गाडी अडवून त्याला काही समजण्याच्या आत हातातील चाकूने अजय यांच्या दंडावर, बरगडीत तसेच मानेवर वार केला. सचिन हा अजयच्या पोटात वार करणार तोच अजय याने हाताने चाकू पकडला. या चाकूहल्ल्यात अजय गंभीर जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.