ETV Bharat / city

कोरोनामुळे मृत्यू झाला महाग, लाकडाचे दर एक महिन्यापासून वाढलेलेच - corona death funeral

कोरोना काळात मृत्यू महागला आहे, कारण अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं महाग झाली आहेत.

wood
लाकूड
author img

By

Published : May 6, 2021, 7:06 PM IST

औरंगाबाद - कोरोना काळात मृत्यू महागला आहे, कारण अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं महाग झाली आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी लागणारा खर्च जवळपास 20 टक्क्यांनी वाढला असल्याचं वास्तव समोर आलं आहे.

हेही वाचा - कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र

लाकडांचे दर वाढले

कोरोनामुळे बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. स्मशानभूमीत येणारे मृतदेह हे सध्याचे भयान वास्तव चित्र समोर आणत आहेत. उपचार महागल्यानंतर त्यात आता अंत्यसंस्कार देखील महागले आहेत. कारण अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य देखील महागले आहे. काही महिन्यांपूर्वी चारशे रुपये क्विंटल मिळणारी लाकडं आता सहाशे ते सातशे रुपये क्विंटल दराने मिळत आहेत. एका अंत्यविधीसाठी साधारणतः चार क्विंटल लाकडं लागतात. त्याचबरोबर तितकी लाकडं आणण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये रिक्षा भाडं लागते. गौऱ्या आणि डिझेल लागते ते वेगळेच. सर्व हिशोब पाहता एका अंत्यविधीसाठी जवळपास तीन हजारांपर्यंत खर्च येत आहे. त्यामुळे आता मृत्यू महाग झाला असे म्हणण्याची वेळ आली आहे.

वाढत्या दरामुळे मसणजोगी अडचणीत

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी चार ते पाच कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असताना मागील काही दिवसांमध्ये रोज जवळपास 25 ते 30 रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीत एक झाली की दुसऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महानगर पालिकेतर्फे अडीच हजार रुपये मसनजोगीना दिले जात आहेत. मात्र लाकडे महागल्याने मिळणारे पैसे अपुरे पडत असल्याने खिशातून पैसे टाकण्याची वेळ स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसनजोगींवर येत आहे. त्यामुळे प्रत्येक अंत्यविधी मागे किमान सहाशे ते आठशे रुपये वाढवून द्यावे अशी मागणी मसनजोगींनी केली आहे.

हेही वाचा - कोरोना संक्रमणात औषधांच्या मदतीच्या नावावर होते प्रचंड लूट, व्हा सावध

विद्युतदाहिनी अंत्यसंस्कार बंदच

कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करावे लागत आहेत. त्यामुळे लाकडांची मागणी वाढली आहे. रोज अंत्यविधींसाठी लाकडांचा होणारा वापर पाहता, निसर्गाची होणारी हाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्युत दाहिणीचा वापर गरजेचा झाला आहे. औरंगाबाद शहरात कैलास नगर स्मशानभूमीत तशी व्यवस्था आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ती व्यवस्था धूळखात पडली आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने विद्युत दाहिणीच्या माध्यमातून होणारे अंत्यसंस्कार बंद करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात विद्युत दाहिणीचा पर्याय अवलंबल्यास लाकडांचा होणारा अतिवापर टळेल आणि पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा घेतला असून लवकरच दोन शवदाहिनी कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.