औरंगाबाद - पैठणच्या नाथसागर जलाशयातुन ( Nathsagar Reservoir ) सन 2006 च्या पावसाळी सत्रात पैठण शहरासह मराठवाड्यातील गोदाकाठच्या शेकडो गावातील नागरिक आपापल्या कामात व्यस्त असतांना जायकवाडी पाटबंधारे खात्याच्या कर्तव्यावर हजर असलेल्या अधिका-यांनी गोदावरी पात्रात अचानक पाणी सोडले. त्यामुळे मोठा हाहाकार उडून प्रचंड नुकसान झाले होते. सोडलेले पाणी पैठण शहरासह गोदाकाठच्या गावात जवळपास पाच दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेले होते. झालेल्या या प्रचंड हानीतून नागरिकांना सावरायला अनेक वर्षे लागली. त्यावेळी मराठवाड्याचे नेते कै.गोपीनाथ मुंडे हे संकटात सापडलेल्या पूरग्रस्त लोकांच्या मदतीला धावून आले होते. 'हा महापुर मानवनिर्मित असुन केवळ जायकवाडी पाटबंधारे खात्याच्या कार्यरत अधिका-यांच्या गलथान कारभारामुळे हा महापुर आल्याचा' गंभीर आरोप त्यांनी गावोगावी पूरग्रस्त गावांना भेटी दिल्यावर केला होता.
नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांना निवेदन - यंदा 2022 च्या पावसाळी सञात नाथसागरातून गोदावरी पात्रात पाणी सोडतांना गोदाकाठच्या शेतजमिनी वाहून जाणार नाहीत तसेच गोदाकाठच्या ऐतिहासिक व शेकडो वर्षांपासून वसलेल्या गावांना पुराचा फटका बसणार नाही, असेच नियोजन करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशा आशयाचे निवेदन दि( 19 ) मंगळवार रोजी रमेश खांडेकर, विष्णू ढवळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांना भेटून दिले. तर यावेळी शिष्टमंडळात काकासाहेब थोटे, जगन्नाथ जमादार, रावसाहेब आडसुळ, अब्दुल गणी बागवान आदी उपस्थित होते.
या आधीही - नाशिक जिल्ह्यात वैजापूर येथे पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. त्यामुळे अहमदनगरला जोडणारे पाच पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे विविध धरणांतील पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत सोडले होते.नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे प्रवाह धोक्याच्या पातळीने वाहत होती. डोणगाव, वांजरगाव, कमलपूर यासह नगरला जोडणारे वाहतूक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी कैलास जाधव, वीरगावचे सपाेनि शरद रोडगे यांनी भेट दिली होती. सराला बेट येथे गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र वांजरगाव येथून सराला बेटाला जोडणाऱ्या पुलापर्यंत पूर आल्याने अधिकाऱ्यांनी बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला भाविकांना प्रवेश देऊ नका अशी विनंती केली होती. त्यानुसार रामगिरी महाराजांनी बेटावरील कार्यक्रमाला भाविकांनी येऊ नये, असे आवाहन केले होते.
शिंदे वस्ती सय्यदवस्तीला पाण्याचा वेढा - गोदावरीला पूर आला की नेहमी प्रमाणे सरला बेटावरील शिंदे वस्ती, सय्यद वस्ती ला पुराचा सर्वात आधी पुराचा वेढा बसतो वस्तीवर अंदाजे 100 कुटुंबातील नागरिक वास्तव्यास आहेत. 300 पेशा अधिक पाळीव जनावरे आहेत. त्यामुळे या कुटुंबापर्यंत ट्रॅक्टरद्वारे प्रशासनाने पोहचत सुरक्षितस्थळी रवाना होण्याची विनंती केली. मात्र या कुंटुबांनी पाणी इथपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Maharashtra breaking News : नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, एकुण 20453 क्युसेक सुरू