औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. दिल्लीगेट परिसरात उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाहणी केली.
शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना -
औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता युती सरकारच्या काळात 1680 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेची घोषणा करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात योजनेच्या काम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कामाची पाहणी करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली.
मनपा आयुक्तांच्या बंगल्यात धावती भेट -
पाणी पुरवठा योजनेच्या पाहणी दौऱ्या दरम्यान मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या बंगल्यात मुख्यमंत्र्यांनी धावती भेट दिली. पाणी पुरवठा योजनेचे ठिकाण आणि मनपा आयुक्तांचा बांगला आजूबाजूला आहे. कार्यक्रम स्थळातून बाहेर पडताच उद्धव ठाकरे मनपा आयुक्तांच्या विनंतीवरून अचानक बंगल्यात गेले. चहापान झाल्यावर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. तिथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.