ETV Bharat / city

चिमुकल्यांना विकत घेऊन मागायला लावत होत्या भिक; पोलिसांनी केले दोन महिलांना जेरबंद - Aurangabad news update

मुकुंदवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज नाथाजी वीर (वय ४७) यांनी या महिला दोन्ही मुलांना दोन दिवसांपासून मारहाण करताना पाहिले होते. याप्रकरणी वीर यांनी महिलांना हटकल्यानंतर त्यांनी या मुलांच्या पालकाकडून प्रत्येकी ५० हजार रूपये येणे बाकी असल्याने त्यांची मुले आणली असल्याचे सांगितले. तसेच तसा बॉण्ड (करार) केल्याचे सांगितले. त्या त्यांना परिसरात भिक मागायला लावत होत्या.

children buying case in Aurangabad
चिमूरड्यांना विकत घेऊन मागायला लावत होत्या भिक
author img

By

Published : Sep 3, 2021, 6:20 PM IST

औरंंगाबाद - एक लाख रूपये परत मिळवण्यासाठी अकोल्याहून दोन महिलांनी दोन चिमुकल्यांना शहरात आणून भिक मागावयास लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जनाबाई (वय ६५) व सविता (वय ३५) रा. मुकुंदवाडी यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोन्हीही महिलांनी सात महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील राहूल पगारे, व शेख पाशा यांच्याकडून या मुलांना विकत आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

चिमुरड्यांना विकत घेऊन मागायला लावत होत्या भिक

मुलांना विकत घेतल्याचा करार केलेला -

मुकुंदवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज नाथाजी वीर (वय ४७) यांनी या महिला दोन्ही मुलांना दोन दिवसांपासून मारहाण करताना पाहिले होते. याप्रकरणी वीर यांनी महिलांना हटकल्यानंतर त्यांनी या मुलांच्या पालकाकडून प्रत्येकी ५० हजार रूपये येणे बाकी असल्याने त्यांची मुले विकत आणली असल्याचे सांगितले. तसेच तसा बॉण्ड (करार) केल्याचे सांगितले.

दोघींना केले जेरबंद -

शिवराज वीर यांनी या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक भराटे यांच्या पथकाने दोन्ही महिलांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. तसेच सतीश आणि शाहरूख अशी या चिमूकल्यांची नावे असून त्यांच्या पालकांना जास्तीची मुले असल्यामुळे त्यांनी उधारी देण्याऐवजी मुलांना आमच्या हवाली केले, असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक भराटे करीत आहेत.

हेही वाचा - बारबालांसोबत काम करणाऱ्या तरुणाने प्राध्यापक होत 'टिश्यू पेपर'मधून मांडला संघर्षपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.