औरंगाबाद : जगात दोनच संघ आहेत. त्यात गौतम बुद्धांचा भिक्कु संघ ( Bhikkhu Sangha of Gautama Buddha ) आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh ) जर अतिरेक्यांच्या निशाण्यावर आर एस एस असेल तर भिक्कू संघ देखील असला ते आश्चर्य वाटणार नाही, मी संविधनाकडून आहे अस वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
आमदार शिरसाट यांनी दिली धमकी : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केले आहेत. शहरातील न्यायाधीशांच्या निवस्थानाच्या बांधकाम प्रकरणात आमदार संजय शिरसाठ यांनी बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिली होती, आपको औरंगाबाद मे काम करणा है, आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली होती. असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी लावला आहे. शहरात होणाऱ्या न्यायाधीश निवासस्थानाच्या बांधकामाचे काम घेण्यासाठी बाबा कनष्ट्रक्शन कंपनी प्रयत्नात होती. मात्र हे काम वंडर कन्स्ट्रक्शनला घ्यायचं होतं म्हणून आमदार संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती. औरंगाबादच्या न्यायाधीशच्या निवासस्थानाच्या बांधकाममध्ये घोटाळा झाला आहे. एका आमदाराने यात हस्तक्षेप केला होता, टेंडर भरण्यापासून घोळ केला आहे. असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्यावर केला आहे.
खासदार जलील संभ्रम निर्माण करतात : राज्यभर सुरू असलेला पीफआय वर सुरू असलेल्या कारवाई बाबत इम्तियाज जलील यांची वक्तवे संभ्रम निर्माण करणारी आहेत. भारतात विघटन निर्माण करणाऱ्या संघटनेला इम्तियाज जलील समर्थन देत आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे. इम्तियाज जलील यांचा मी निषेध करतो, इम्तियाज जलील हे पीएफआय चे सहानुभूतीदार आहेत का? असा प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थितीत केला.
खासदार सुळे यांनी केली कॉपी
सुप्रिया सुळे यांनी जबाब दो स्लोगन ची कॉपी केली आहे. राष्ट्रवादीने पीएफआय च्या बाबतीत आपली भूमिका जाहीर करावी. शरद पवार यांच्या विरोधात मलबार हिल येथे आणि पुणे येथे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची चौकशी सीआयडी करत आहे. ते कधी रियाक्ट होत नाहीत पण काल ते रियाक्ट झाले त्याचं कारण काय? दाऊद ने बॉम्ब ब्लास्ट केला तो काळ शरद पवार यांच्या सत्तेचा काळ होता, अस देखील वकील सदावर्ते यांनी सांगितलं.