ETV Bharat / city

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा चुराडा - औरंगाबाद लेटेस्ट

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील छावणी परिसरात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा चुराडा झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकचा मात्र अक्षरशः चुराडा झाला असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा चुराडा

author img

By

Published : May 16, 2021, 12:31 PM IST

औरंगाबाद - औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील छावणी परिसरात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा चुराडा झाल्याची घटना घडली आहे. जालन्याहून लोखंडी सळई घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने, त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचा मात्र अक्षरशः चुराडा झाला आहे.

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा चुराडा

कोणतीही जीवित हानी नाही

जालन्याहून मालवाहू ट्रक (एम.एच.१२ डी.जि.७१५८) लोखंडी सळई घेऊन पुण्याकडे जात होता. दरम्यान छावणी भागात ट्रकच्या समोर अचानक एक दुचाकीस्वार आला. या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. यावेळी ट्रकचालाने प्रसांगवधान राखून उडी घेतल्याने चालकाचा जिव वाचला. परंतु या अपघातामध्ये ट्रकचा चुराडा झाला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती छावनी पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर कोंडी झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा - चटका लावणारी एक्झिट! वाचा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.