औरंगाबाद - आजपर्यंत आपण हनुमानाचे अनेक रूप पाहिले आहेत. ज्यामध्ये संजीवनी पर्वत उचलणारा हनुमान किंवा त्याचा इतर भावमुद्रा आपण अनेक वेळा पाहिले आहेत. मात्र, औरंगाबादच्या खुलताबाद येथे निद्रावस्थेत ( khultabad Sleeping Hanuman Statue ) असलेला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. देशांमध्ये तीन ठिकाणी अशा मुर्ती आहेत, त्यामध्ये खुलताबाद ( Khultabad Hanuman Temple ) हे देखील एक आहे.
हनुमानाची निद्रावस्थेत असणारी मूर्ती - खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मराठवाडा नाही, तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणाहून भक्त दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी निद्रा अवस्थेत असलेली मूर्ती पाहायला मिळते. संपूर्णतः शेंदुरनी अच्छादन केलेली मूर्ती, सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. नवसाला पावणारा असा मारुती अशी देखील आख्यायिका आहे. देशात तीन ठिकाणी अशा निद्रावस्थेत असलेल्या हनुमानाच्या मूर्ती पाहायला मिळतात. भद्रा मारुती संस्थान औरंगाबाद, कोतवाली मंदिर प्रयाग इलाहाबाद, आणि खोले के हनुमानजी राजस्थान या तीन ठिकाणी अशा मूर्ती पाहायला मिळतात.
अशी आहे आख्यायिका - औरंगाबाद वेरूळ रस्त्यावर भद्रा मारुती देवस्थान आहे. वेरूळपासून पाच किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. औरंगाबादच्या भद्रा मारुतीला पहिले 'भद्रावती' असं म्हणलं जायचं. त्या ठिकाणी राजा भद्रसेन हा रामभक्त होता. ज्याने हे मंदिर उभारलं होतं. त्यामुळे त्याला भद्रावती असं म्हटलं जायचं. त्यानंतर कालांतराने भद्रामारूती असं नाव त्याला पडलं. एक वेळेस राजा भद्रसेन राम भक्ती करत असताना मग्न झाला होता आणि भजन गात होता. त्याच्या आवाजाने श्री हनुमान त्याच्या जवळ आले आणि भजन ऐकत मंत्रमुग्ध झाले. तिथेच ते समाधीत लीन झाले होते. त्यावेळेस हनुमान यांना पाहून राजा भद्रसेन यांनी आपण इथेच विराजमान व्हा, अशी विनंती केली होती. त्यावरून हनुमानाने वरदान दिलं आणि त्यांची एक समाधी मुद्रा तिथे विराजमान झाली. तर दुसरीकडे अशी देखील आख्यायिका आहे की जेव्हा लक्ष्मण यांचे प्राण वाचवायचे होते. त्यावेळेस संजीवनी जडीबुटी घेण्यासाठी हनुमानजी गेले होते. त्यावेळेस विश्रांतीसाठी थांबले होते आणि तिथेच त्यांची एक प्रतिमा कायमस्वरूपी स्थापन झाली. त्या ठिकाणी भद्रामारूती असं नाव पडल आणि त्याच ठिकाणी त्यांचं मंदिर उभारले गेले.
हनुमान जयंती होणार उत्साहात साजरी - दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, कोरोनाचा महामारीमुळे दोन वर्ष उत्सव साजरा करण्यात निर्बंध होते. आता हे निर्बंध काढण्यात आले असून मोठ्या उत्साहात पुन्हा एकदा हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. मध्यरात्रीपासूनच हनुमान भक्त मंदिराकडे येत असतात. रस्त्याने अनेक श्रद्धाळू मोफत फळ वाटप करत असतात. यावर्षी पुन्हा एकदा हनुमान जयंतीचा जल्लोष पाहायला मिळेल. त्यासाठी जय्यत तयारी केल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे.
हेही वाचा - Bus Accident : लग्नासाठी गावी चाललेल्या खासगी बसला अपघात, 25 जखमी