ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये दुचाकीवर जाणाऱ्या तीन मद्यपींची पोलिसाला मारहाण - औरंगाबाद न्यूज

कोरोनामुळे लागू असलेल्या नवीन नियमावलींचे पालन करताना रात्रीच्या वेळी पोलीस नाकाबंदी करताना दुचाकीवर विनामास्क जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवले. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तिघांनी पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली.

पोलिसाला मारहाण
पोलिसाला मारहाण
author img

By

Published : Aug 7, 2021, 7:26 AM IST

औरंगाबाद - दुचाकीवर बसून जाणाऱ्या तीन विनामस्क युवकांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको चौकात घडला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

तीन मद्यपींची पोलिसाला मारहाण
विनामास्क युवकांनी केला हल्ला कोरोनामुळे लागू असलेल्या नवीन नियमावलींचे पालन करताना रात्रीच्या वेळी पोलीस नाकाबंदी करताना दुचाकीवर विनामास्क जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवले. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तिघांनी पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यातच कर्तव्यावर असणाऱ्या गणेश लोखंडे या पोलिसाला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. वाद सोडवण्यासाठी उपस्थित इतर पोलिसांनी धाव घेतली असता, तिघांनी सर्व पोलिसांना शिवीगाळ केल्याचे समोर आले.
पोलीसांसोबत झाला वाद
पोलीसांसोबत झाला वाद

शुक्रवारी व्हिडिओ झाला व्हायरल
गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या वादाचा व्हिडियो शुक्रवारी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये प्रताप जगताप, आकाश कुलकर्णी, आशुतोष झिंझोडे हे तिघे पोलिसांसोबत वाद घालून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे दिसून आलं. हल्ला करणाऱ्या तिन्ही तरुणाची सिडको पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Political Analysis : दिल्लीतील वाढलेल्या राजकीय गाठीभेटींचा नेमका अर्थ काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.