ETV Bharat / city

मराठवाड्यात साहित्य निर्मितीचा अनुशेष नाही; मसापच्या साहित्य संमेलनात चव्हाण यांचे प्रतिपादन

साहित्याच्या दृष्टीने मराठवाड्यात अनुशेष नाही. येथे असलाच तर तो विकासाचा अनुशेष आहे. मात्र, तोही आम्ही भरून काढू. तसेच शासन साहित्यिक चळवळीला नेहमीच सहकार्य करत आहे. यापुढेही केले जाईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या, लोकसंवाद फाउंडेशन आयोजित (41)व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शनिवारी (दि. 25)रोजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या, लोकसंवाद फाउंडेशन आयोजित (41)व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

author img

By

Published : Sep 26, 2021, 7:19 AM IST

औरंगाबाद - मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष असेल, पण साहित्य निर्मितीचा अनुशेष नाही. शासन साहित्यिक चळवळीला नेहमीच सहकार्य करत आहे. यापुढेही केले जाईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या, लोकसंवाद फाउंडेशन आयोजित (41)व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शनिवारी (दि. 25)रोजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मसापच्या मागण्यांची आम्हाला आठवण आहे. सहा महिन्यांत नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाला जागा देऊ. तसेच, अन्य प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊ, तसेच कृती आराखडाही बनवू आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी दर सहा महिन्यांनी बैठक घेत राहू, असे आश्वासनही चव्हाण यांनी यावेळी दिले आहे.

'गोंदण' या स्मरणिकेचे प्रकाशन

यावेळी यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी कोरोनाच्या मोठ्या कालावधीनंतर चांगलीच गजबजलेली पाहायला मिळाली. सगळीकडे बऱ्याच दिवसांनी एका मोठ्या सार्वजनीक कार्यक्रमाचे आजोजन झाल्याचा आनंद पाहायला मिळत होता. संमेलनातील व्यासपीठांना संत जनाबाई व्यासपीठ आणि प्र. ई. सोनकांबळे यांची नावे देण्यात आली आहेत. दरम्यान, यातील मुख्य संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटन सोहळा पार पडला. मावळते संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी (41)व्या संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्याकडे सूत्रे सोपवली. साहित्य संमेलनाच्या 'गोंदण' या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी राधाबाई बिरादार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलीक अतकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रविकिरण सावंत, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. बळीराम धापसे, डॉ. हंसराज जाधव आदींची उपस्थिती होती.

'मसापला नांदेडात कार्यालय द्यावे'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाला परवानगी मिळेल की नाही, इथपासून अनेक प्रश्न मनात होते. पण अनेक अडचणींवर मात करत हे संमेलन आज होत आहे, याचा आनंद आहे, अशी भावना मसापचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली. 'मसाप' ही संस्था नांदेड शहरात जन्माला आली. नंतर पुढे तिचा विस्तार झाला, पण नांदेडमध्ये संस्थेला हक्काचे कार्यालय नाही. याविषयी पाच वर्षांपूर्वी अशोकरावांनी आश्वासन दिले होते. ते अजूून पूर्ण झालेले नाही. अशोकरावांनी मनावर घ्यावे आणि संस्थेला नांदेडात हक्काची जागा मिळवून द्यावी, असी अपेक्षा ठाले पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

श्याम देशपांडे ग्रंथनगरी

आपली हयात ग्रंथ चळवळीत घालवलेले श्याम देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना मानवंदना म्हणून संमेलनाच्या ग्रंथनगरीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते सकाळी फीत कापून या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी मराठवाडाभरातून विविध प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी वाचकांनी पुस्तक खरेदीसाठी गर्दी केली होती.

मसापच्या कार्यकारिणीची बैठक

उद्घाटन सोहळ्यानंतर ना. गो. नांदापूरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गेल्या वर्षभरात निधन झालेल्या देशभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यात मराठवाड्यातील सि. ना. आलुरे गुरुजी, त्र्यंबक महाजन, श्याम देशपांडे, सीमा मोघे, माजी आमदार संतोष दसपुते, श. मा. पाटील, सुलोचना महानोर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांच्यासह राज्य आणि देशपातळीवरील अनेक नेते, कार्यकर्ते, साहित्यिक आणि विचारवंतांना अभिवादन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.