ETV Bharat / city

Shurapanka Dahan : औरंगाबादमध्ये पत्नी पीडित संस्थेतर्फे शूर्पणखा दहन - शुरपनका दहन

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन ( Ravana Dahan ) करून वाईट वृत्तीचा सर्वनाश केला जातो. मात्र ही वृत्ती पुरुषांमध्ये नाही तर, महिलांमध्येच असते. त्यामुळे पत्नीपीडित पुरुष संघटना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून शूर्पणखा दहन ( Shurapanka Dahan ) करून महिलांमधील वाईट वृत्तींचा नाश करण्यात आला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 5, 2022, 5:51 PM IST

औरंगाबाद - दसऱ्याच्या दिवशी रावण दहन ( Ravana Dahan ) करून वाईट वृत्तीचा सर्वनाश केला जातो. मात्र ही वृत्ती पुरुषांमध्ये नाही तर, महिलांमध्येच असते. त्यामुळे पत्नीपीडित पुरुष संघटना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून शूर्पणखा दहन ( Shurapanka Dahan ) करून महिलांमधील वाईट वृत्तींचा नाश करण्यात आला.

शूर्पणखा दहन

शुरपनका मुळे घडले रामायण... रामायणाचा अभ्यास केला तर,रावण हा शूर, हुशार असा राजा होता. मात्र त्याची बहीण शूर्पणखा ही चांगल्या वृत्तीची नव्हती. राम वनवासच असताना त्यांच्याकडे तिचे लक्ष गेले. ती त्याच्या प्रेमात पडली. प्रभू राम विवाहित होते. एक पत्नी होती, तरीही त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा तिने प्रयत्न केला. त्यावर लक्ष्मणाने तिचे नाक कापले, तिला शिक्षा दिली. रावणाने आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी सीतेचे अपहरण केले. रावणाला बहिणीमुळे त्याला पाप करावा लागले. ही वृत्ती आज अनेक महिलांमध्ये आहे. अनेक पुरुषांचे जीवन अशाच वृत्तीचा नायनाट करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शुरपनका पुतळा दहन केले जाते. अनोख्या पद्धतीने महिलांवरील खराब वृत्तीच्या महिलांचा निषेध केला जातो.

पुरुषांवर होणाऱ्या अन्याय बाबत लढते संघटना... पत्नी पीडित पुरुष संघटना गेल्या काही वर्षांपासून महीलांपासून पीडित पुरुषांसाठी काम करते. अत्याचारी पुरुषांप्रमाणे महिला देखील असतात. मात्र महिलांच्या बाबतीत तयार केलेल्या कायद्यांचा काही महिला गैरफायदा घेत असतात. पती, त्याच्या कुटुंबीयांना काही चूक नसताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महिला सुरक्षा कायद्याप्रमाणे पुरुष सुरक्षा कायदा स्थापन करण्याची मागणी पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर कायदा सर्वांसाठी समान असतो अस म्हणतात तर शिक्षा पुरुषांना का? महिलेच्या तक्रारी नंतर चौकशी करावी, तक्रार खोटी असेल तर महिलेला देखील शिक्षा व्हावी अस मत संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारी यांनी व्यक्त केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.