औरंगाबाद - नात्यांमध्ये कितीही दुरावा असला तरी माणसाच्या अंत्यसमयी त्याच्या मुलांचा किंवा नातेवाईकांचा सहवास मिळावा, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र उतार वयात सांभाळणं तर सोडाच, मात्र मृत्यूनंतर मुलांनीच अग्नी देण्यास पाठ फिरवल्याची घटना समोर आली आहे.
औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमातील मनाला चटका लावणारं आणणार वास्तव उघडकीस आलंय. वृद्धाश्रमात शंभरहून अधिक आजी आजोबा वस्त्याव्यस आहेत. वृद्धाश्रमात राहात असताना बहुतांश मुलं आपल्या आई वडिलांची चौकशी देखील करत नसल्याचे हे वृद्ध सांगतात. जिवंतपणी नाही, मात्र मृत्यूनंतर तरी आपल्या मुलांची शेवटचं पाणी पाजावं अशी अपेक्षा प्रत्येकाची असतेच. मात्र मागील तीन महिन्यांमध्ये सहा वृद्धांचा मृत्यू झाला. त्यापैकी पाच वृद्धांच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी लॉकडाऊनचे कारण देत अंत्यविधीसाठी येण्यास नकार दिल्याची माहिती मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी दिली.
अर्धा किलोमीटरवर घर असूनही अंत्यविधीला नातेवाईक आले नाही
वृद्धांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलांना त्याबाबत माहिती दिली. मात्र लॉकडाऊन असल्याने यायला जमणार नाही; विधी उरकून घ्या, असं उत्तर आम्हाला मिळालं. एका वृद्धांचे नातेवाईक अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर वास्तव्यास आहेत. मृत्यूनंतर आम्ही त्यांना संपर्क केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यावेळी आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन दुःखद वार्ता दिली. 'तुम्ही पुढे जा.. आम्ही आलोच' असे त्यांनी सांगितले. आम्ही वृद्धाश्रमात आल्यावर तीन तास वाट पाहूनही कोणीही न आल्याने आम्ही स्वतः त्यांचे अंत्यविधी केले. असा अनुभव सागर यांनी शेअर केला.
आमच्या येथे राहणाऱ्या आजी आजोबांना तर हा नेहमीचाच लॉकडाऊन आहे. अनेक आजी आजोबा असे आहेत ते आपल्या मुलांची, नातवांची किंवा नातेवाईकांची वाट पाहतात; मात्र कोणी येत नाही. अंत्यविधीसाठी आता लॉकडाऊनचे एक कारण झाले. मात्र असे अनुभव आम्हाला नेहमीच येतात. मात्र आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेला म्हणून आम्हाला दुःख होत. त्यांच्यावर आम्ही त्यांच्या रीतीरिवाज प्रमाणे अंत्यसंस्कार करून आमची जबाबदारी पार पाडतो. मृत्यू समयी आपल्या लोकांसोबत वेळ जावी, अशी इच्छा वृद्धांची असते. मात्र ती अपुरी राहते, याच दुःख होतं, असं मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी व्यक्त केलं.
वृद्धाश्रमात वस्त्याव्यस असलेल्या आजी आजोबांमध्ये नैराश्य पसरते. आपल्या मृत्यू नंतर तरी आपल्या मुलांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे, अशी भावना आजी आजोबांनी व्यक्त केली. अशा घटना पाहता खरच समाजातील माणुसकीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.