औरंगाबाद : इंटरनॅशनल सेंटर इन्स्टिट्यूट (आयटीआय) या पॅरिसमधील संस्थेतर्फे हा जागतिक रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश असा आहे की जगभरामध्ये जेवढे काही कला सादर करणारे लोक आहे. जे नाटक या कल्पनेशी जोडले गेलेले आहेत.आणि नाटक या कलेद्वारे आपल्या विचारांची अभिव्यक्ती ते करतात अशा सर्व रंगकर्मींसाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.स्मिता साबळे यांच्याशी संवाद साधला.
माणसांना एकत्र आणण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा मुप्तपणे व्यक्त होण्यासाठी नाटक ही कला आहे. एक नाटक कला केवळ मनोरंजनासाठी नाही तर ती समाजासाठी ही हितासाठी आहे हा संदेश पोहोचला पाहिजे. समाजामध्ये वेळोवेळी काही चांगले बदल होणे अपेक्षित असते. नाटक समाजाच्या किती हितासाठी आहे हे प्रकर्षाने जाणवून देण्यासाठी हा जागतिक रंगभूमी दिवस साजरा केला जातो.
हेही वाचा - Interview With Rohit Roy : बाबासाहेबांची भूमिका साकारणे आव्हानात्मक; अभिनेता रोहित रॉय यांच्याशी खास बातचीत
नाट्य कलेतून समाजाबद्दलची बालकांची जाण
'आपल्या शालेय शिक्षणामध्ये खरोखर कलांचा अंतर्भाव व्हावा.ही अनेक वर्षापासूनची मागणी रास्तच आहे. शालेय शिक्षण घेणारा तरुण वर्ग आपल्या राष्ट्राची पुढील आपली संपत्ती आहे.यात पिढीला केवळ पुस्तकी किंवा पुस्तकी ज्ञानाला पुरतीच मर्यादित ठेवावी हे आपल्या शिक्षणामध्ये अपेक्षित नसावा, तर मुलांना त्यांच्या विचारांची मांडणी व त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती प्रकार योग्य रीतीने करता येणार अपेक्षित आहे. समाजामध्ये विघातक घटना घडतात. लहान लहान मुलांच्या हातून काही वाईट घटना घडतात. मोबाईलचा उपयोग कसा करावा हे पालकांना माहीत नाही. शालेय शिक्षणामध्ये नाट्य कला ठेवल्यास त्याद्वारे आपण त्या बालमनावर चांगले संस्कार करू शकतो. समाजाबद्दलची बालकांची जाण वाढू शकतो. इतरांच्या भावनांचा विचार कसा करावा भावनांची अभिव्यक्ती कशी करावी याची जाण नाटकावर येऊ शकते. आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये नाटक याकरिता निश्चितच अंतर्भाव व्हायला हवा,' असेही डॉ. साबळे म्हणाले.
आरोग्याची काळजी घेऊन नाटक करावे
पूर्वी होते तसे कोरोना काळामध्ये नाटकावर फक्त आपली उपजीविका करणारे अनेक कलावंत,अभिनेते आणि अभिनेत्री यांचे खरोखर खूप वाईट हाल झाले. त्यांच्या समस्या उभ्या राहिल्या आणि मग त्यांनाही काही पर्याय निवडले.आता दोन वर्ष निघून गेले. आता बऱ्यापैकी आपणास सर्वच आपल्या समाजात आपण परत नवीन आपण दिशेने वाटचाल करत आहे. एक सकारात्मक वाटचाल आहे. आणि म्हणून आत्ताच्या या कोरोना नंतरच्या काळात जर आपण नाटकाचा विचार केला तर कदाचित नाटकाची वेळ आता कमी करावी लागेल.आणि ते पूर्वीच झालेलं आहे. तीन तीन चार तास नाटकाची लांबी कमी करावी लागेल. त्याचबरोबर व्यवस्थित व्हेंटिलेशन, बसण्याची व्यवस्थित व्यवस्था असने गरजेचं असणार आहे. या संकटानंतर सर्वच व्यक्तींना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. म्हणून नाट्यकलावंत असू दे किंवा नाटक बघणारा प्रेक्षक त्यात प्रत्येकाला आपली काळजी घ्यावी लागेल, असेही डॉ. साबळे म्हणाले.
हेही वाचा - VIDEO : मराठी रंगभूमीवरील पाहिले ब्लॅक अँड व्हाइट नाटक 'द क्लॅप'