औरंगाबाद - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची ओळख आहे. मात्र या बालेकिल्ल्यात शिवसेनेला मोठे आव्हान देण्यात येत आहे. हे आव्हान मोडून काढण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात स्टार प्रचारकांच्या सभा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवसेना चांगल्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
दानवे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास कदम यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासारखे नेते सभा घेणार आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराने आणि बजाज कामगार युनियनने या निवडणुकीत शिवसेनेऐवजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र या पाठिंब्याचा शिवसेनेला फरक पडणार नसून शांतिगिरी महाराज 2009 मध्ये स्वतः उमेदवार होते. मात्र त्यावेळीदेखील शिवसेना निवडणून आली होती. नाराजांची समजूत शिवसेना काढेल आणि शिवसेना पुन्हा निवडणून येईल, असा विश्वासही शिवसेनेने व्यक्त केला आहे.