ETV Bharat / city

Sexual abuse of a minor girl : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण - Sexual abuse of a minor girl news

मुकुंदनगर येथे राहणार्‍या आजीकडे राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केला.पीडित मुलीस गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. (Sexual abuse of a minor girl ) मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

author img

By

Published : Feb 25, 2022, 11:06 AM IST

औरंंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील मुकुंदनगर येथे राहणार्‍या आजीकडे राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. पीडित मुलीस गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोव्हेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिचे लैंगिक शोषण

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, लक्ष्मण उर्फ अक्षय गोविंद दराडे (वय २१,रा. मुकुंदनगर, रेल्वेपटरीजवळ) असे आरोपीचे नाव आहे. गारखेडा परिसरातील विजयनगरात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मुकुंदनगरात राहणार्‍या आपल्या आजीकडे नोव्हेंबर २०२० मध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख लक्ष्मण उर्फ अक्षय दराडे याच्यासोबत झाली होती. (Sexual abuse of a minor girl Aurangabad Didtrict) लक्ष्मण उर्फ अक्षय दराडे याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, पीडित मुलीस गर्भधारणा झाली असून ती सध्या आठ महिन्याची गर्भवती आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मण उर्फ अक्षय दराडे याच्याविरूध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीता ८ महिन्यांची गरोदर

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केलेली १५ वर्षांची पिडीता ही ८ महिन्यांची गरोदर आहे. आरोपी हा पिडीतोसाेबत लग्न करण्यास तयार आहे. या पिडीतेला उपचारासाठी एका दवाखान्यात दाखल केल्यानंतर वय कमी असल्यामुळे रुग्णालयाने घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तेव्हा पिडीतेसह तिचे नातेवाईक तक्रार देण्यास तयार नव्हते. मात्र, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी संबंधितांचे समुपदेशन केल्यानंतर पिडीतेने तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सचिन मिरधे करीत आहेत.

हेही वाचा - 'NSE'चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना 'CBI'कडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.