औरंगाबाद - कोरोनाच्या धास्तीने मार्चपासून बंद असलेल्या शहरातील शाळांचे वर्ग सुरु झाले आहे. सोमवारपासून नववी-दहावीचे वर्ग भरवण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यानी शाळेत प्रेवेश केला.
या नियमांचे करावे लागणार पालन
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळेत यायचे असल्यास त्यांना पालकांचे हमीपत्र आवश्यक असून, त्यावर पालकांची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. प्रत्येक शिक्षक कोरोबा चाचणी केलेला असणे गरजेचे असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच शाळेत येण्यास परवानगी आहे.
ग्रामीण भागातील नववी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्या पाठोपाठ शहरातील अकरावी-बारावीचे वर्ग देखील सुरू झाले होते. या वर्गांचा प्रतिसाद बघून नववी-दहावीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहे. या पुढील 15 दिवस नववी ते दहावीच्या वर्गाचा प्रतिसाद बघून प्राथमिक वर्गांचा व कोचिंग क्लासेसचा विचार केला जाणार आहे. सुरुवातीला गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे वर्ग होतील. दरम्यान शहरात 1431 शाळा, शहराध्यक्ष 1100 शिक्षक संख्या आहे.
तपासणी तीन शिक्षक पॉझिटिव्ह
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. 28 जानेवारी ते 30 डिसेंबर पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान शहरातील तीन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.