ETV Bharat / city

'मी पीत नाही बिडी, माझ्याकडे कशाला येईल ईडी?'

संजय राऊत यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती द्यावी आणि तसेच 125 भाजपा नेत्यांची माहिती त्यांच्याकडे आहे, तर ते पुरावे त्यांनी ईडीला द्यावेत, अस वक्तव्य आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.

ramdas athwale
ramdas athwale
author img

By

Published : Dec 29, 2020, 5:34 PM IST

Updated : Dec 29, 2020, 5:54 PM IST

औरंगाबाद - मी पीत नाही बिडी, माझ्याकडे कशाला येईल ईडी, माझाकडे सत्तेची ईडी मग कसा येईल ईडी, असा टोला केंद्रीयमंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी औरंगाबादेत लगावला. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली आहे, त्यावर त्याला मी काय करू, अशी मिश्किल टीका करत व्यवसाय करणाऱ्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा. तिचा तपशील व्यवस्थित ठेवावा. चौकशीत त्यांनी ते सादर करावे. काही होत नाही. संजय राऊत यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती द्यावी आणि तसेच 125 भाजपा नेत्यांची माहिती त्यांच्याकडे आहे, तर ते पुरावे त्यांनी ईडीला द्यावेत, अस वक्तव्य आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.

फडणवीस अजित पवारांच्या भरवश्यावर

फडणवीस म्हणतात मी पुन्हा येईल तर ते अजित पवारांच्या भरवश्यावर, अस म्हणत आहेत. ते आले होते, त्यांनी राहायला पाहिजे होते. त्यात काँग्रेसने पाठिंबा काढला तर चांगलेच आहे. शरद पवार यांचा आदर आम्ही करतो, त्यांना नेतृत्व मिळाले तर चांगलेच, पण काँग्रेस त्यांना संधी देणार नाही, याच मुद्द्यावर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडू शकते. काँग्रेस मोठा पक्ष आहे पण तो आता तसा मोठा पक्ष राहिला नाही, अस वक्तव्य आठवले यांनी करत, शेतकरी आंदोलन करत असताना राहुल गांधींनी इटलीचा दौरा करण्याची गरज नव्हती, अशी टीका आठवले यांनी केली.

'प्रकाश आंबेडकर माझ्याशी बोलत नाहीत'

आरपीआयचे नाव बदलायचे नाही, पक्ष संपवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, मात्र पक्ष तळागाळात पोहोचविण्याचे काम करत आहे. रिपब्लिकन पक्षांमध्ये आता ऐक्य शक्य नाही, माझी तयारी आहे. मात्र प्रकाश आंबेडकर तयार नाहीत, त्यांनी वंचित स्थापन केली. त्यात त्यांना मत मिळाली मात्र जागा मिळाल्या नाहीत, सत्ता मिळविण्यासाठी जागा निवडून आणल्या पाहिजे, स्वतःच्या बळावर सत्ता मिळवणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी विचार करावा. 1998नंतर ऐक्य तुटल्यापासून ते बोलत नाहीत. त्यांना बोलायचे असेल तर मी तयार आहे. त्यांनी एनडीएमध्ये यावे, असा सल्ला आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला.

'शेती कायद्यात शरद पवारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आंदोलनकर्ते नेते जबाबदार आहे, तोडगा निघू शकतो त्यासाठी काही तडजोड करावी लागते, काही लोक हट्टाहास करत आहेत. त्यामुळे मार्ग निघत नाही. सरकार चार पाऊल मागे आले आहे, एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील. लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही, आज उद्या होणाऱ्या बैठकीत जडजोडीचा मार्ग काढावा. 2020चे आंदोलन 21पर्यंत नेऊ नये. पवार साहेबांनी बैठक घ्यावी मात्र त्यांनी विरोधासाठी विरोध न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, त्यांनी विरोधकांसोबत चर्चा करावी, आणि काही दुरुस्ती असले तर ती सुचवावी त्यावर नक्की विचार होईल, ते कृषिमंत्री होते. काँग्रेसच्या काळात कायदा प्रस्तावित होता अस आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले.

'मुंबई मनपात उपमहापौर आरपीआयचा'

आगामी काळात भाजपासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार आहोत. त्यात आम्हाला चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे. मुंबईत आमच्या पक्षाची चांगली ताकत आहे. तिथे आम्ही चांगल्या जागा जिंकू शकतो. 2022मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महापौर भाजपाचा तर उपमहापौर आरपीआयचा होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Last Updated : Dec 29, 2020, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.