औरंगाबाद - फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीशी जवळीक साधत सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या तरूणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय वानखेडे (रा. महालक्ष्मी कॉलनी, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी येथील एक तरुणीचा विवाह २०१२ सली नांदगाव तालुक्यातील एका मुलाशी विवाह झाला होता. मात्र पती कामधंदा करत नसल्याने पती पत्नीचा वाद होत असे. दरम्यान २०१८ मध्ये मुलगी सासरी मुकुंदवाडी येथे आली होती. यावेळी विवाहितेची फेसबुकवरून अक्षय वानखेडे याच्यासोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यानंतर त्याने तरुणीसोबत काही फोटो काढले होते.
फोन करून देत असे धमक्या -
दरम्यान, पतीसोबत वाद मिटल्यानंतर विवाहिता २०१९ मध्ये सासरी नांदालयला गेली. यावेळी अक्षयने विवाहितेच्या मोबाईल नंबरवर कॉल करून तिला धमकाविणे सुरू केले. तु माझ्याशी फोनवर बोलत जा. मी बोलवीन तेव्हा औरंगाबादला येत जा. तू नाही आलीस तर तुझे सगळे फोटो सोशल मीडियावर अपलोड करेल अशी धमकी देणे सुरू केले. त्यानंतर पतीच्या मोबाईलवर देखील कॉल करून धमकी दिली. त्याप्रमाणे अक्षय याने इंस्ट्राग्रामवर तसेच फेसबुकवर विवाहितेच फोटो टाकणे सुरू केले. दरम्यान ही बाब सासरच्या मंडळीने पाहिल्यानंतर विवाहितेला माहेरी आणून सोडले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अक्षय वानखेडे विरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक शरद इंगळे करीत आहे.
हेही वाचा - 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज